Advertisement

ही दुर्घटना नसून हत्याच आहे- वारिस पठाण


ही दुर्घटना नसून हत्याच आहे- वारिस पठाण
SHARES

गेल्या ५ वर्षांपासून मी धोकादायक इमारतींवर आवाज उठवत आहे. मी अनेकदा विधानसभेतही आवाज उठवला आहे. त्यावर सरकारकडून केवळ आश्वासन मिळालं. कारवाई कुठलीच करण्यात आली नाही. त्यामुळे आज घडलेली घटना ही दुर्घटना नसून हत्याच असल्याचा खळबळजनक आरोप एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केला आहे. 

डोंगरीतील १०० वर्षे जुनी केसरबाई मेन्शन ही ४ मजली इमारत कोसळून त्यात आतापर्यंत ४ जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर ८ जण जखमी झाले आहेत. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच वारिस पठाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली.

हेही वाचा: डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली : Live Updates

काय म्हणाले पठाण?

एखादी इमारत धोकादायक झाल्यास सरकारकडून केवळ नोटीस देऊन इमारतीला धोकादायक म्हणून घोषित करण्यात येतं. इमारत खाली करण्याला प्राधान्य देण्यात येत नाही. कारण तेथील रहिवाशांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येते. ही जबाबदारी राज्य सरकारला झटकायची असते. ज्या कुठल्या इमारती खाली करण्यात येतात तेव्हा तेथील रहिवाशांना थेट माहुलच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्यात येतं. त्यामुळे रहिवासी इमारत खाली करण्यास तयार नसतात. उलट ते जीवावर उदार होऊन तिथंच राहतात. सरकारही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतं. धोकादायक इमारत ज्या परिसरातील आहे, तिथंच रहिवाशांचं पुनर्वसन करावं, असं मी सरकारला अनेकदा सांगितलं. पण माझ्या बोलण्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं, असा आरोपही त्यांनी केला.   हेही वाचा-

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली : Live Updates

दुर्घटनाग्रस्त इमारत म्हाडाची नाही- विनोद घोसाळकरRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा