Advertisement

दुर्घटनाग्रस्त इमारत म्हाडाची नाही- विनोद घोसाळकर

२०१२ मध्ये म्हाडानं डोंगरीतील केसर बाई या इमारतीला पुनर्विकासासाठी एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) दिली होती. परंतु, ही इमारत म्हाडाची नसून एका ट्रस्टची आहे, असं विनोद घोसाळकर यांनी म्हटलं.

दुर्घटनाग्रस्त इमारत म्हाडाची नाही- विनोद घोसाळकर
SHARES

मुंबईतल्या डोंगरी परिसरातील केसरबाई या ४ मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच,  अनेक जण जखमी असून ४० ते ५० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे. ही इमारत म्हाडाची असल्याची म्हटलं जात होतं. परंतु, म्हाडा इमारत दुरुस्ती मंडळाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी दुर्घटनाग्रस्त इमारत म्हाडाची नसल्याचा दावा केला आहे. 

एका ट्रस्टची इमारत

ही इमारत म्हाडाची उपकरप्राप्त इमारत असली तरी या इमारतीचा समावेश मोडकळीस आलेल्या इमारतींच्या यादीत नव्हता. कारण, म्हाडानं ही इमारत रहिवाशांच्या संमतीनं पुनर्विकासासाठी एएसबी रियाल्टर्स या बिल्डरच्या ताब्यात दिली होती. सोबतच म्हाडानं  २०१२ मध्ये या इमारतीला पुनर्विकासासाठी एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) दिली होती. बिल्डरनं या इमारतीच काम का सुरू केलं नाही, याची चौकशी करणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली होती. 

मात्र, ही इमारत म्हाडाची नसून एका  ट्रस्टची असल्याचा दावा  विनोद घोसाळकर यांनी केला आहे. या परस्परविरोधी वक्तव्यांमुळं म्हाडा आपल्यावरील जबाबदारी झटकत असल्याचं म्हटलं जात आहे.

अनेक जण ढिगाऱ्याखाली

मंगळवारी सकाळच्या सुमरास ही घटना घडली असून, अद्याप अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. अग्निशमन दल, पोलीस, एनडीआरएफचे जवान आणि स्थानिक युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. ही इमारत कोसळ्यानं परिसरातील इतर इमारतीही रिकाम्या करण्या आल्या आहेत. हेही वाचा -

डोंगरी इमारत दुर्घटना: विकासकाची चौकशी करणार- मुख्यमंत्री

डोंगरीत ४ मजली इमारतीचा भाग कोसळून १२ जणांचा मृत्यूRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा