Advertisement

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

रस्त्यावर दरड कोसळल्यानं मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai Goa Highway Closed) ठप्प झाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प
SHARES

रस्त्यावर दरड कोसळल्यानं मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai Goa Highway Closed) ठप्प झाला आहे. कशेडी घाटापासून जवळच पोलादपूर तालुक्यातील धामणदेवी गावाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक तातडीनं थांबवण्यात आली आहे. रात्रीची वेळ असल्यानं दरड हटवण्याच्या कामात अडथळे येत आहेत.

पोलादपुर पोलीस, महामार्ग पोलिस, बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि एल अँड टीची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. अंधार आणि त्यात पाऊस असल्यानं दरड हटवण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे या कामास अधिक वेळ लागू शकतो. हे काम रात्रभर चालू शकतं. कारण मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा आणि भलेमोठे दगड रस्त्यावर आले आहेत. हे काम करण्यास रात्र जाऊ शकते. कदाचित सकाळपर्यंत देखील हे काम चालू राहू शकतं. तोपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहील.

गेले काही दिवस रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. पोलादपूर, महाड भागात गेल्या दोन दिवसांत दरडी कोसळण्याच्या तीन घटना घडल्या आहेत.हेही वाचा

खोटी माहिती सादर करून मिळवली पालिकेत नोकरी, पाच जणांवर गुन्हा दाखल

पालिकेची कारवाई, संतप्त विक्रेत्यांनी भाजी फेकली रस्त्यावर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा