Advertisement

पालिकेची कारवाई, संतप्त विक्रेत्यांनी भाजी फेकली रस्त्यावर

पालिकेच्या कारवाईवर फेरीवाल्यांनी नाराजी व्यक्त केली. सगळ्या फेरीवाल्यांनी आपल्या भाज्या रस्त्यावर फेकल्या.

पालिकेची कारवाई, संतप्त विक्रेत्यांनी भाजी फेकली रस्त्यावर
SHARES

वसईतील भाजी मार्केटमध्ये गुरुवारी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत होती. त्यावर पालिकेनं कारवाई करत गर्दी दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी फेरीवाल्यांनी नाराजी व्यक्त केली. सगळ्या फेरीवाल्यांनी आपल्या भाज्या रस्त्यावर फेकल्या.

प्रशासकिय अधिकाऱ्यांनी गुरुवारी वसईच्या दीनदयाळ नगरपालिका बाजारात १२ वाजताच्या सुमारास फेरीवाल्यांवर कडक कारवाई केली. कारण त्यांनी मास्क घातला नव्हता. याशिवाय ते सोशल डिस्टनसिंग पाळत नव्हते.

भाजी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी देखील मास्क आणि सोशल डिस्टनसिंग पाळले नव्हते. त्यामुळे पालिकेनं कारवाई करत भाजी विक्रेत्यांचा माल जप्त केला. यावरून भाजी विक्रेते नाराज झाले आणि त्यांनी सर्व भाजी रस्त्यावर फेकून दिल्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी बाजार बंद केला.

प्रशासकिय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, विक्रेता दीनदयाळ मार्केटमध्ये बेकायदेशीरपणे भाजीपाल्याच्या गाड्या लावत होते. त्यापैकी बहुतेकांनी मास्क घातला नव्हता. शिवाय सोशल डिस्टनसिंगचे नियम देखील पाळत नाहीत. या विक्रेत्यांनी रस्त्यावर भाजीपालाही फेकला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा.


हेही वाचा : Vasai Virar Nalasopara Containment Zones List : 'हे' आहेत वसई, विरार, नालासोपारातील कंटेन्मेंट झोन


२ मार्चला देखील अशीच एक घटना अंबाडी रोड इथं घडली. नागरी अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली होती. त्यामुळे त्यांनी भाज्या रस्त्यावरही फेकल्या.

वसई-विरारमध्ये अद्याप पूर्ण लॉकडाऊन करण्यात आलं नाही. बुधवारपर्यंत इथं कोरोना रुग्णांची संख्या ५ हजार ६९९ इतकी आहे. तर १३० लोकांचा मृत्यू झाला आहे.हेही वाचा

वसई विरारमधील रहिवाशांना 'ही' प्रमाणपत्र मिळणार ऑनलाईन, अशी आहे प्रक्रिया

वसईतील 'ह्या' १२ खाजगी रुग्णालयांत शासकीय दरात उपचार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा