कोरोना रुग्णांवर राज्य शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार उपचार होण्यासाठी वसई-विरार महापालिका खाजगी रुग्णालयांत खाटा आरक्षित करत आहे. पालिकेने आणखी दोन खाजगी रुग्णालये अधिग्रहित केली आहेत. त्यामुळे वसई-विरार महापालिका क्षेत्रात कोरोनावर उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांची एकूण संख्या १२ झाली आहे.
वसई-विरार शहरात अनेक रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे पालिका खाजगी रुग्णालये अधिग्रहित करून त्यात खाटा उपलब्ध करून देत आहे. याआधी पालिकेने १० खाजगी रुग्णालये अधिग्रहित केली होती. आता त्यात २ नव्या रुग्णांची भर पडली आहे.
राज्य शासनाने खाजगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी दर निश्चित करून दिले आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालये रुग्णांची आर्थिक लूट करू शकणार नाहीत, असं पालिकेनं सांगितलं आहे. कोणत्या रुग्णालयाने कोरोना रुग्णांसाठी अधिक दर आकारल्यास कोरोना कंट्रोल युनिट दूरध्वनी क्रमांक ०२५०-२३३४५४६/ ०२५०-२३३४५४७ वर तक्रार करावी, असं आवाहन पालिकेनं केलं आहे.
ही आहेत खाजगी रुग्णालये
हेही वाचा -
मुंबईत कोरोनाचे ८०६ नवे रुग्ण, ६४ जणांचा दिवसभरात मृत्यू
violating lockdown in Maharashtra नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी १ लाख ५४ हजार जणांवर गुन्हे दाखल