Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,26,710
Recovered:
46,00,196
Deaths:
78,007
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,859
2,116
Maharashtra
5,46,129
46,781

वसई-विरारमध्ये रुग्णवाहिकेसाठी नियंत्रण कक्ष स्थापन, 'हा' आहे क्रमांक

नागरिकांनी या नियंत्रण कक्षावर संपर्क केल्यास त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे.

वसई-विरारमध्ये रुग्णवाहिकेसाठी नियंत्रण कक्ष स्थापन, 'हा' आहे क्रमांक
SHARES

वसई-विरार महापालिकेने कोरोना रुग्णांना रुग्णालयातून ने-आण करण्यासाठी रुग्णावाहिका नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नागरिकांनी या नियंत्रण कक्षावर संपर्क केल्यास त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे. रुग्णवाहिकांची कमतरता आणि खाजगी रुग्णवाहिकांकडून होणारी लूट रोखण्यासाठी पालिकेने प्रथमच रुग्णवाहिका नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. याशिवाय पालिका नवीन २५ रुग्णवाहिका आणणार आहे. 

रुग्णवाहिकेसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करणारी वसई विरार ही पहिली महापालिका ठरली आहे. पालिकेच्या मुख्यालयातील तळमजल्यावर हा रुग्णवाहिका कक्ष आहे. या कक्षाचा संपर्क क्रमांक ८५३०८२३१७० असा आहे. नागरिक रुग्णवाहिका नियंत्रक चंद्रकांत भोजने- ७२१८९८७९५६, सूरज पांडे- ९३७३५७३९९५ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

वसई विरार शहरात कोरोनाग्रस्त संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. २०३ नवीन रुग्ण आढळले. आजवरची एकाच दिवसातील ही सर्वाधिक वाढ आहे. वसई विरार महापालिका क्षेत्रातील एकूण रुग्णांची संख्या २ हजार ६४३ एवढी झाली आहे. आतापर्यंत १०२ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ हजार ९१ रुग्ण उपचार घेत आहेत.

सध्या शहरात पालिकेच्या केवळ २० रुग्णवाहिका आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे या रुग्णवाहिका अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे  २५ रुग्णवाहिका घेण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. तसंच पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेसचा वापरही रुग्णांची ने-आण करण्यासाठी होणार आहे.हेही वाचा -

Mission Zero: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 'मिशन झिरो' मोहीम

Coronavirus Pandemic: मुंबईत २१४१ रुग्णांची कोरोनावर मात, ५८ जणांचा दिवसभरात मत्यू
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा