Advertisement

Coronavirus pandemic: मुंबईत २१४१ रुग्णांची कोरोनावर मात, ५८ जणांचा दिवसभरात मत्यू

मुंबईत मागील २४ तासात करोनाचे २१४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३९ हजार १५१ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

Coronavirus pandemic:  मुंबईत २१४१ रुग्णांची कोरोनावर मात, ५८ जणांचा दिवसभरात मत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे १९२ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १३६५ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत गुरूवारी  दिवसभरात ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- Mumbai Police to hold flag march मालाडच्या आप्पापाडा परिसरात पोलिस आयुक्त ध्वजमार्च काढणार

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत गुरूवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५८ रुग्ण दगावले आहेत. तर २४ जून रोजी ३८ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २३ जून रोजी रोजी एकूण ४२ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, गुरूवारी मुंबईत कोरोनाचे १३६५ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ७० हजार ९९० इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात  करोनाचे २१४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३९ हजार १५१ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- कोरोनावर औषध असल्याचा दावा भोवला, रामदेव बाबांना महाराष्ट्र सरकारचा दणका

राज्यात आज ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७७ हजार  ४५३ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.४२ टक्के एवढे झाले आहे. आज कोरोनाच्या ४८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६३ हजार ३४२ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी १ लाख ४७ हजार ७४१ नमुने पॉझिटिव्ह (१७.४२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५६ हजार  ४२८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  राज्यात आज १९२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी १०९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत.

हेही वाचाः- CBSC Exams : बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द

सध्या राज्यातील मृत्यूदर  ४.६९ टक्के एवढा आहे. मागील ४८ तासात झालेले १०९ मृत्यू हे मुंबई मनपा-५८, ठाणे मनपा-३, नवी मुंबई मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-१,मीरा-भाईंदर मनपा-१,वसई-विरार मनपा-२,रायगड-१ जळगाव मनपा-१, जळगाव-४, नंदूरबार-१, पुणे-१, पुणे मनपा-१६, पिंपरी-चिंचवड मनपा-४, सातारा-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-८, अकोला-१, अकोला मनपा-१, बुलढाणा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील असून इतर राज्यातील २ मृत्यूंचा समावेश आहे.

सक्रीय कंटेनमेंट झोन (चाळ)  ७७०

सीलबंद इमारती ५९५१

२४ तासातील संपर्काचा शोध अति जोखिम  ५७४६

CCC1 मधील अति जोखीम  १७६१४

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा