Advertisement

कोरोनावर औषध असल्याचा दावा भोवला, रामदेव बाबांना महाराष्ट्र सरकारचा दणका

आता पुन्हा एकदा रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीला महाराष्ट्र सरकारनं झटका दिला आहे.

कोरोनावर औषध असल्याचा दावा भोवला, रामदेव बाबांना महाराष्ट्र सरकारचा दणका
SHARES

मंगळवारी योगगुरू रामदेव बाबा यांनी कोरोनावर (Coronavirus Update) औषध सापडल्याचा दावा केला. पतंजलीनं (Patanjali) तयार केलेलं कोरोनील (Coronil) हे औषध देखील लाँच करण्यात आलं. पण लाँच केल्यानंतर काही तासांमध्येच आयुष मंत्रालयानं त्यावर आक्षेप घेतला. कोरोनीलच्या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली. आता पुन्हा एकदा रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीला महाराष्ट्र सरकारनं झटका दिला आहे.  

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukha) यांनीही कोरोनिल औषधाबाबत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. 'पतंजलीनं क्लिनिकल ट्रायल घेतल्या की नाही हे जयपूरची नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्सेस शोधून काढेल. नाही तर अशा खोट्या औषधाची विक्री महाराष्ट्रात करू दिली जाणार नाही' असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील कोरोनिल औषधावर संशय व्यक्त केला होता. 'ज्या लोकांना बाबा रामदेव यांच्यावर विश्वास आहे. त्यांनी हे औषध खरेदी करावे', अशी भूमिका अजित पवारांनी मांडली होती.

दरम्यान, केंद्र सरकारनं पतंजलीला नोटीस बजावली आहे. या औषधाबाबत आपल्याला माहिती नसल्याचं म्हणत याबाबत आधी सविस्तर माहिती द्या अशा सूचना आयुष मंत्रालयानं पतंजलीला दिल्या होत्या. त्याचबरोबर पूर्ण पडताळणी होईपर्यंत कोरोनिलची जाहिरात थांबवावी, असे आदेश देत केंद्रीय आयुष मंत्रालयानं पतंजलीला दणका दिला.

केंद्र सरकारनंतर उत्तराखंड सरकारनेही पतंजलीला नोटीस बजावली. उत्तराखंड सरकारने पतंजलीला खोकला-तापाच्या औषधासाठी परवाना दिल्याचं स्पष्ट केलं आहे. पतंजलीनं केलेल्या अर्जामध्ये कोरोना व्हायरसचा उल्लेख नव्हता असं सांगितलं. पतंजलीला कोरोना किटसाठी परवानगी कशी मिळाली, याचे उत्तर देण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत.हेही वाचा

'इथं' होणार कोरोनाची अँटीजन टेस्ट, ३० मिनिटात रिझल्ट

कोरोनानंतर 'या' आजाराचा मुंबईत शिरकाव, ३१ जणांचा मत्यू

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा