Advertisement

वसईतील 'ह्या' ४ खासगी रुग्णालयात कोरोनावर मोफत उपचार

वसईतील चार खासगी रुग्णालयात कोरोनावर विनामूल्य उपचार होणार आहे.

वसईतील 'ह्या' ४ खासगी रुग्णालयात कोरोनावर मोफत उपचार
SHARES

वसईतील चार खासगी रुग्णालयात कोरोनावर विनामूल्य उपचार होणार आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यांना श्वसनाचा त्रास आहे किंवा तब्येत खालावली आहे अशा रुग्णांनाच या योजनेअंतर्गत उपचार मिळतील. सौम्य लक्षणे असलेल्यांना अलगीकरणात उपचार केले जातात.

वसई-विरार शहरातील ९ खासगी रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. त्यातील ४ रुग्णालयात या योजनेत कोरोनावर उपचार होणार आहेत. सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचार मिळण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. याआधी फक्त केशरी शिधापत्रिका असणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र आता सर्वासाठी योजना खुली झाली आहे. १ हजार २०० आजार 

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कव्हर केले जातात. वसईतील गोल्डन पार्क आणि जनसेवा रुग्णालयात कोरोना रुग्णांवर या योजनेअंतर्गत उपचार सुरू झाले आहेत. तर नालासोपारामधील स्टार आणि गॅलेक्सी या दोन रुग्णालयांतही लवकरच या योजनेअंतर्गत कोरोनावर उपचार केले जाणार आहेत. जर रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिला तर नागरिकांना १५५३८८ या टोल फ्री हेल्पलाइनवर तक्रार करता येणार आहे. 


 रुग्णालये

१) गोल्डन पार्क रुग्णालय, वसई ( ९१५२५९८२५१, ९७६३८४७६०९)

२) जनसेवा रुग्णालय, पापडी, वसई ( ९१७२२१८१२३ ९१७२२१८१२४)

३) स्टार रुग्णालय, नालासोपारा ( ९८९२५२७०३९) 

४) गॅलेक्सी रुग्णालय नालासोपारा ( ८६९३८७६११७)



हेही वाचा -

समुद्रात ८ दिवस मोठी भरती, मुंबईकरांना संतर्कतेचा इशारा

Covid-19 Test: महाराष्ट्रात १० लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पार




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा