Advertisement

खोटी माहिती सादर करून मिळवली पालिकेत नोकरी, पाच जणांवर गुन्हा दाखल

पगार मिळाला नाही, पुढे त्यांचा पगार काढतावेळी झालेल्या तपासणीत हा प्रकार उघड झाल. त्यानुसार या चौघांवर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले.

खोटी माहिती सादर करून मिळवली पालिकेत नोकरी, पाच जणांवर गुन्हा दाखल
SHARES

पालिकेच्या नावाचा वापर करून चुकीच्या पद्धतीने पालिकेत अनुकंपावर नोकरी मिळवत पालिकेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात माहिम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. या पूर्वी ही अशा बोगस रॅकेटचा पोलिसांनी पर्दापाश केला होता.

हेही वाचाः- मुंबईत आतापर्यंत ३ लाख ६४ हजार कोरोना चाचण्या

पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागेवर बोगस कागदपत्रांचा वापर करत भलत्याच माणसांनी नोकरी दिल्याचा प्रकार या पूर्वीही पोलिसांनी उजेडात आणला होता. नुकताच पालिकेच्या जी उत्तर विभागातील सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक प्रकाश साबळे यांच्या तक्रारीवरून माहिम पोलिस ठाण्यात अशाच पद्धतीने पालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महापालिकेतून कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याच्या कुटुंबिबियांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रशासकीय अधिकार-याकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होऊन ते प्रकरण ग्रँड रोड येथील प्रमुख अभियंता घनकचरा यांच्या कार्यालयात येते. तेथे याप्रकरणांची पुढील पडताळणी केली जाते. पुढे सर्व प्रक्रिया झाल्यानंतर संबंधीत कर्मचा-याला नियुक्तीच्या ठिकाणी पाठवण्यात येते. जी उत्तर विभागात मध्ये चार सफाई कर्मचारी बनावट नियुक्ती पत्राच्या सहाय्याने हजर झाले होते. मूळात ऑगस्ट २०१७ ते ऑक्टोबर २०१८ या कालावधीत हा प्रकार घडला असून बोगस नियुक्तीपत्राच्या सहाय्याने चार कर्मचा-यांना  हजर करण्यात आल्यामुळे त्यांची बायोमेट्रीक हजेरी होत नव्हती. त्यामुळे त्यांना पगार मिळाला नाही, पुढे त्यांचा पगार काढतावेळी झालेल्या तपासणीत हा प्रकार उघड झाल. त्यानुसार या चौघांवर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले.

हेही वाचाः- मास्क न लावताच घराबाहेर पडणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

विभागीय चौकशीत ग्रँट रोड घन कचरा व्यवस्थापन विभागातील काही कर्मचा-यांचा याप्रकरणी सहभाग आढळला. त्यानंतर त्यांच्याबाबतही पोलिसांकडे याप्रकरणी रितसर तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार नीता सुर्वे, किसन बांडे, तानाजी घाग, हर्षल शेळके व दलाल मुरगन कुक्कुस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या पाच जणांवर पोलिसांनी भादंवि कलम १२० (ब) कट रचणे, ४१९(तोतयागिरी), ४२०( फसवणूक), ४६५(बनावटीकरण), ४६७, ४६८ व ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल कण्यात आले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा