Advertisement

ऑमिक्रॉनचा धोका, मुंबईतल्या लसीकरणाला वेग

कोरोनाचा धोका लक्षात घेता मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी लसीकरणावर भर दिला जात आहे.

ऑमिक्रॉनचा धोका, मुंबईतल्या लसीकरणाला वेग
SHARES

कोरोनाचा धोका लक्षात घेता मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरण हा कोरोनावर जालीम उपाय असल्यानं मोठ्या प्रमाणात लसीकरण केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील लसीकरणानं आता दीड कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत १ कोटी ६७ लाख ७२ हजार ५६७ मात्रा देण्यात आल्या आहेत.

मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वीपर्यंत धिम्या गतीनं सुरू असलेल्या लसीकरणाला पुन्हा वेग आल आहे. लसीकरणासाठी पालिका, खासगी व सार्वजनिक अशी एकत्रित ४४९ केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यातील ५९२ सत्रांमध्ये हे लसीकरण झाले आहे. 

मुंबईमध्ये आत्तापर्यंत ९६,६८,९८० नागरिकांना पहिली मात्रा देण्यात आली असून, ७१,०३,५८७ जणांनी दुसरी मात्रा घेतली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये पहिली व दुसऱ्या मात्रांची एकूण संख्या ६०,३९,४२२ इतकी असून, महापालिकेच्या लसीकरण केंद्रामध्ये ही संख्या ९६,१०,१४९ आहे. 

राज्य सरकार तसंच केंद्र सरकारच्या लसीकरण केंद्रांमध्ये महापालिकेच्या लसीकरण केंद्रापेक्षा कमी संख्येनं लसीकरण झालं असून, ही संख्या ७,८६,२३५ इतकी असल्याचं समजतं.

१८ ते ४४ या वयोगटामध्ये सर्वाधिक लसीकरण झाले असून, पहिली मात्रा ५७,४५,०७१ जणांना तर दुसरी मात्रा ३८,०८,२२१ जणांना देण्यात आली आहे. ४५ ते ५९ या वयोगटातील २१,४३,८५७ जणांना पहिली तर १७,८५,९०४ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. याच क्रमाने फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांमध्ये ही संख्या २,३५,५८० आणि १,८८,३२४ अशी नोंदवण्यात आली आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये या मात्रांची संख्या १,८९,८८४ व १,४३,५२८ इतकी आहे. राज्यात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात रोज सरासरी सात ते आठ लाख नागरिकांना लस देण्यात येत होती. परंतु शेवटच्या आठवड्यापासून लसीकरणाचा आलेख सरासरी ४ ते ५ लाखांनी कमी झाला.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात यात आणखी घट झाली. दिवाळीच्या दिवसांत नागरिक लसीकरणासाठी येत नसल्यामुळे ही संख्या रोडावली. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा लसीकरणाने हळुहळू वेग घेतला आहे.

ऑमिक्रॉन संसर्गाच्या भीतीनं आता अनेक जण लसीकरणासाठी पुढे येत आहेत. ज्यांनी लस घेतली नव्हती, त्यांना आवाहनही करण्यात येत आहे. कंत्राटी कामगार, विविध आस्थापनांमध्येही लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी लसीकरणाची सुविधा हवी असलेल्या सोसायट्या तसेच संस्थांनी संबधित प्रभाग कार्यालयांमध्ये संपर्क साधून लसीकरणासाठी तयार असलेल्या लाभार्थ्यांची संख्या सांगितल्यास शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. कोणत्याही कारणाने लसीकरण टाळू नये वा दुसरी मात्रा चुकवू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा