Advertisement

गौतम नवलखा, तेलतुंबडे यांचा हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला

भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) प्रकरणी गौतम नवलखा (Gautam Navalakha) आणि आनंद तेलतुंबडे (anand Teltumbde) यांना मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) मोठा दणका दिला आहेे.

गौतम नवलखा, तेलतुंबडे यांचा हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला
SHARES

भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) प्रकरणी गौतम नवलखा (Gautam Navalakha) आणि आनंद तेलतुंबडे (anand Teltumbde) यांना मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) मोठा दणका दिला आहेे. नवलखा आणि तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज (Bail application) न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) दाद मागण्यासाठी दोघांना अटकेपासून ४ आठवड्यांचा दिलासा देण्यात आला आहे. याशिवाय सुनावणीसाठी या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारा राज्य सरकारचा अर्जही उच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे.

शहरी नक्षलवाद आणि कोरेगाव-भीमा (Bhima Koregaon) हिंसाचार प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं  (Mumbai High Court) नकार दिल्यानंतर गौतम नवलखा (Gautam Navalakha) आणि आनंद तेलतुंबडे (anand Teltumbde) यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पुणे पोलिसांनी नवलखा व तेलतुंबडे यांच्यावर २०१८ ऑगस्टमध्ये गुन्हा नोंदवला होता. या दोघांविरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेली कागदपत्रे  तपासलेली नाहीत. तसंच पुणे पोलिसांनी अद्याप त्यांचा यासंदर्भात दोघांचा साधा जबाबदेखील नोंदवलेला नाही. या प्रकरणाशी यांचा काहीही संबंधच नाही असा युक्तिवाद दोघांच्यावतीने न्यायालयात केला.

 मात्र, याप्रकरणी हे दोघेही एल्गार परिषदेशी संबंधित असून कोरेगाव-भीमा प्रकरणात यांच्या सहभागाबाबतही अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्याबाबत चौकशी आणि अधिक तपास सुरू असल्य्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास राज्य सरकारने न्यायालयात तीव्र विरोध केला.



हेही वाचा -

मुंबईतल्या डबेवाल्यांना मिळणार हक्काचे घर, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन

राजकीय उमेदवारांच्या गुन्ह्यांची माहिती जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा