Advertisement

महापौर वाचनालयात अवतरतात तेव्हा!


महापौर वाचनालयात अवतरतात तेव्हा!
SHARES

मुंबई महापालिका मुख्यलयात नगरसेवकांसाठी वाचनालय असले तरी या वाचनालयाचा लाभ नगरसेवकांनी घेतला असा क्षण दुर्मिळच. मागील महापालिकेतील २ ते ४ नगरसेवक वगळता ५ वर्षांत कोणीच या वाचनालायकडे फिरकले नव्हते. आताही नगरसेवकांना वाचनालयाची ओळख नसल्यामुळे हे वाचनालय अगदीच दुर्लक्षित आहे. वृत्तपत्रांची दैनंदिन कात्रणे काढण्यापालिकडे या वाचनालयाच्या वास्तूची ओळख महापालिका सदस्यांना नाही. या वाचनालयाला महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अचानक भेट देत नगरसेवकांना याठिकाणी यावसं वाटेल असं प्रसन्न वातावरण तयार करा, जाळेजळमटं दूर करा, असे आदेश महापालिका चिटणीस विभागाला दिले.


'इथे' आहे वाचनालय

महापालिका मुख्‍यालयातील नवीन विस्‍तारित इमारतीच्‍या पहिल्‍या मजल्‍यावर नगरसेवक आणि नगरसेविकांसाठी वाचनालयाची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे. या वाचनालयाला ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. नगरसेवक आणि नगरसेविका नागरी सेवा-सुविधा नागरिकांना व्‍यवस्थित मिळाव्‍यात, याकरता लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्‍या वाचनालयात नियमित येऊन विविध विषयांवरील पुस्तिकेचे वाचन करावं. त्यासोबतच संदर्भ ग्रंथांचं विस्‍तृत वाचन करण्‍यासाठी, ग्रंथ तसेच शासन निर्णय अधिनियमांची पुस्तिका मुदतीच्‍या कालावधीसाठी निवासस्‍थानी घेऊन जाण्याची सोय आहे.


ग्रंथसूचींची पाहणी

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शुक्रवारी सकाळी अचानक मुख्‍यालयातील वाचनालयात दाखल होऊन वाचनालयातील विविध ग्रंथसूचींची पाहणी केली. या भेटीने वाचनालयातील कर्मचारी अवाक् झाले. महापालिका चिटणीस प्रकाश जेकटे आणि विभागाच्या प्रमुख नेहा धुमाळ यांनी महापौरांना येथील सर्व पुस्तकांची माहिती दिली. यावेळी ग्रंथालयात आणखी आवश्‍यक असेल असे ग्रंथ उपलब्‍ध करावे, असे निर्देश महापौरांनी दिले. 

महापौरांनी स्‍वतः ग्रंथालय सूचीतील महाराष्‍ट्र शासन झोपडपट्टी पुनर्वसन आणि निर्मूलन (सुधारणा, निर्मुलन आणि पुर्नविकास) अधिनियम विश्‍व ही पुस्तिका क्रमांक १३ आणि महाराष्‍ट्र अधिनियम - १९६६ हे पुस्‍तक वाचनासाठी घेतलं.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा