Advertisement

Mumbai metro: गुड न्यूज! मुंबई मेट्रो आजपासून सुरू

महाराष्ट्र सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत मंगळवारी नवी नियमावली जारी करत गुरूवार १५ आॅक्टोबर २०२० पासून मुंबईतील मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

Mumbai metro: गुड न्यूज! मुंबई मेट्रो आजपासून सुरू
SHARES

महाराष्ट्र सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत मंगळवारी नवी नियमावली जारी करत गुरूवार १५ आॅक्टोबर २०२० पासून मुंबईतील मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तर मुंबई लोकल मात्र बंद राहणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईकर प्रवाशांना थोडाफार का होईना दिलासा मिळणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करत आहे. या अनलाॅकच्या पाचव्या टप्प्याला १ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहेत. या अंतर्गत ठाकरे सरकारने बरेच निर्बंध आतापर्यंत शिथिल केले आहेत. त्यातच राज्य सरकारकडून नवं परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या परिपत्रकात मुंबई मेट्रो सेवा सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रो सेवेसाठी नगरविकास विभागाने जी मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत ती या सेवेसाठी लागू असतील. त्याचं काटेकोरपणे पालन करण्यात यावं, असंही नमूद करण्यात आलं आहे.

याचसोबत ग्रंथालयं सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयं तसंच शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार असल्या तरी शिक्षक, इतर कर्मचाऱ्यांना ५० टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे. ऑनलाइन शिक्षण, टेली काऊन्सलिंग वर भर देण्यात येणार असून शाळा शिक्षण विभागाकडून यासंबंधी नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.

१५ ऑक्टोबरपासून कंटेन्मेंट झोनच्या बाहेर आठवडी बाजार भरवला जाऊ शकतो. याशिवाय दुकानं २ तास अतिरिक्त उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे दुकानं सकाली ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु राहू शकतात, असं राज्य सरकारने परिपत्रकात नमूद केलं आहे.


हेही वाचा-

१५ ऑक्टोबरपासून पश्चिम रेल्वेवर धावणार एसी लोकल

आदित्य ठाकरेंनी केली मेट्रो कारशेडच्या नव्या जागेची पाहणी, म्हणाले...


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा