Advertisement

दिलासादायक! मुंबईतील मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये ३५ टक्क्यांनी घट

मुंबईतील मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये देखील एका आठवड्यात ३५ टक्क्यांनी घट झाल्याची दिलासाजनक माहिती समोर येत आहे.

दिलासादायक! मुंबईतील मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये ३५ टक्क्यांनी घट
SHARES

मागील अनेक दिवसांपासून कोरोनानं ग्रासलेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. विशेष म्हणजे मुंबईतील मायक्रो कटेंमेंट झोनमध्ये देखील एका आठवड्यात ३५ टक्क्यांनी घट झाल्याची दिलासाजनक माहिती समोर येत आहे. महापालिकेकडून कोणत्याही निवासी इमारतीमध्ये ५ पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास संबंधीत संपूर्ण इमारत मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ) म्हणून घोषित केली जाते. 

कोरोनासंबंधित पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबई शहरात सध्या ७२८ सक्रिय मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ) इमारती आहेत. यापूर्वी २८ एप्रिल २०२१ रोजी मुंबईतीय या मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ)ची इमारतींची संख्या ११०१ वर पोहचल होती. सध्या अंधेरी पश्चिमकडील के पश्चिम (केडब्ल्यू) पालिका वॉर्डमधील जुहू, विलेपार्ले, वर्सोवा आणि लोखंडवाला या परिसरात तब्बल २१५ मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ) इमारती आहेत. जी मुंबईतील सर्वाधिक संख्या आहे.

महापालिकेच्या डी वॉर्डमधील ग्रँट रोड, मलबार हिल आणि नॅपियन सी रोडमधील १६४ इमारती या ग्रँट रोड, मलबार हिल आणि नॅपियन सी रोडवर १६४ मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ)आहेत. तर कुर्ला आणि चांदिवली या एल वॉर्डमधील ५८ इमारती या मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ)म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. तर भायखळा व्यापणार्‍या ई वार्डमध्ये ५६ मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ) आहेत. मार्चनंतर मुंबई कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती.

बहुतांश घरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत होते. त्यामुळं आपोआपच इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढत होते. दरम्यान मुंबईतील अनेक भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण नोंदवले जात आहे. यात एका कुटुंबात जास्तीत जास्त दोन रुग्ण आढळत असल्याने त्यांना अगलीकरणात ठेवणे सोपे होत असल्याची माहिती समोर येत आहे. कंटेंट कॉन्ट्रॅक्ट झोन (CZ) होते. सध्या शहरात केवळ ९ हजार ६९ सील्ड फ्लोर्स (SF) आहेत तर १०२ कंटेंट कॉन्ट्रॅक्ट झोन (CZ)आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा