Advertisement

गणेशोत्सव मंडळाचे एकही अर्ज प्रलंबित ठेवू नका : आयुक्त

मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त आणि सर्व खातेप्रमुख व विभागप्रमुखांची मासिक आढावा बैठक शनिवारी महापालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडप परवानगीसह इतर कामांचा आढावा आयुक्तांनी घेतला.

गणेशोत्सव मंडळाचे एकही अर्ज प्रलंबित ठेवू नका : आयुक्त
SHARES

सार्वजनिक गणेशोत्सव मंडप उभारणीसाठी मंडळांकडून येणारे अर्ज निश्चित वेळेत मंजूर करून  कुठलाही अर्ज प्रलंबित ठेऊ नका, असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व विभागीय सहायक आयुक्तांना दिले आहेत. अर्जामध्ये त्रुटी असल्यास त्या बाबी सुस्पष्टपणे नमूद करुन अर्ज फेटाळला जावा. मात्र, अर्ज फेटाळण्याची कारणे संबंधितांना सुस्पष्ट कळवावीत, असंही अायुक्तांनी आपल्या आदेशात नमूद केलं आहे.


आयुक्तांनी घेतला आढावा 

मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त आणि सर्व खातेप्रमुख व विभागप्रमुखांची मासिक आढावा बैठक शनिवारी महापालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडप परवानगीसह इतर कामांचा आढावा आयुक्तांनी घेतला.  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच मंडप विषयक परवानग्या देण्यात याव्यात. तसेच विनापरवानगी एकही मंडप आपल्या कार्यक्षेत्रात उभा राहणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे आदेश सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. मंडप तसेच प्रवेशद्वार परवानग्यांची प्रक्रिया या वर्षीपासून पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे.


नलाईन अर्ज करण्यास मार्गदर्शन

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना अर्जदारांना काही अडचणी येऊ शकतात. हे लक्षात घेता सर्व विभाग कार्यालयांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिका-यांना कार्यालयात बोलावून त्यांच्याकडून ऑनलाईन अर्ज भरुन घ्यावेत. यासाठी महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांमध्ये परवानग्यांशी संबंधित काम बघणा-यांनी त्यांच्या कामकाजातील दररोज एक तास राखून ठेवावा व सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिका-यांना सहकार्य करावं अशाही सूचना त्यांनी केल्या आहेत.


अग्निसुरक्षा नियम बंधनकारक

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप व प्रवेशद्वाराची उभारणी ही अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करुन केली असल्याची खातरजमा करवून घेतली घ्यावी.  मुंबईतील अनेक ठिकाणी मुंबई मेट्रोची तथा एमएमआरडीएची कामे सुरु आहेत. या अनुषंगाने आवश्यकतेनुसार मुंबई मेट्रो तथा एमएमआरडीएचे अधिकारी आणि पोलीस दलाशी समन्वय साधला जावा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.



हेही वाचा - 

तुरूंगातून आरोपीला करायचीय बिल्डरविरोधात महारेरात तक्रार

अकरावी प्रवेशप्रक्रियेत पुन्हा गोंधळ, विद्यार्थ्यांचे आयडी ब्लॉक




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा