Advertisement

तुरूंगातून आरोपीला करायचीय बिल्डरविरोधात महारेरात तक्रार

ठाणे कारागृहात खुनाच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठीत असलेल्या एका आरोपीला एका बिल्डरविरोधात तक्रार करायची आहे. यासंबंधी या आरोपीनं ठाणे कारागृहातून लेखी अर्जाद्वारे तक्रार करण्यासाठी काय करावं लागेल अशी विचारणा केली आहे. तर महारेरानं मात्र नियमानुसार आॅनलाईन तक्रार नोंदवा असं लेखी उत्तर या आरोपीला कळवलं आहे.

तुरूंगातून आरोपीला करायचीय बिल्डरविरोधात महारेरात तक्रार
SHARES

महारेराकडे गेल्या सव्वा वर्षात माहिती अधिकाराखाली आलेल्या अर्जांसह अर्जाद्वारे दिलेली उत्तरं महारेरानं आपल्या वेबसाईटवर टाकण्यास सुरूवात केली आहे. बांधकाम विभागासह महारेराच्या कारभारात पारदर्शकता आणणाऱ्या महारेराच्या या निर्णयामुळं एक अनोखी बाब समोर आली आहे. ती बाब म्हणजे ठाणे कारागृहात खुनाच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठीत असलेल्या एका आरोपीला एका बिल्डरविरोधात तक्रार करायची आहे.

यासंबंधी या आरोपीनं ठाणे कारागृहातून लेखी अर्जाद्वारे तक्रार करण्यासाठी काय करावं लागेल अशी विचारणा केली आहे. तर महारेरानं मात्र नियमानुसार आॅनलाईन तक्रार नोंदवा असं लेखी उत्तर या आरोपीला कळवलं आहे. पण आता हा आरोपी कारागृहातून आॅनलाईन तक्रार कशी नोंदवणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण कारागृहात अशी व्यवस्थाच नाही.


लेखी तक्रारीची विचारणा

शिवप्रसाद बालगोविंद केशरी न्या. बंदी ४५८२/७०, मुख्य सर्कल, ठाणे सेंट्रल जेल, ठाणे या पत्त्यावरून १७ जुलै २०१८ रोजी महारेराकडे माहिती अधिकाराखाली अर्ज केला आहे. या अर्जानुसार आपण गेल्या ६५ महिन्यांपासून ठाणे कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहोत. तेव्हा आपल्याला एका बिल्डरविरोधात तक्रार करायची आहे. तर ही तक्रार लेखी स्वरूपात कशी करता येईल अशी विचारणा या शिवप्रसाद केशरी नावाच्या आरोपीनं केली आहे.


आॅनलाईन तक्रार नोंदवा

तर ही विचारणा करताना आपल्या अर्जात शिवप्रसाद केशरीनं बिल्डरचा पी ९९०००००५५१६ हा महारेरा नोंदणी क्रमांकही नोंदवला आहे. तर हा नंबर कुठल्या बिल्डरला आणि कोणत्याही प्रकल्पासाठी दिला आहे अशीही विचारणा त्याने केली आहे. त्यानुसार महारेराच्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी तक्रार करण्यासंबंधीची सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असून संबंधीत संकेतस्थळावर आॅनलाईन तक्रार नोंदवावं असं लेखी उत्तर शिवप्रसाद केशरीला कळवलं आहे. त्याचवेळी संबंधित महारेरा नोंदणी क्रमांक पुनम लाईफस्टाईल बिल्डरचा असून पुनम पार्क प्रकल्पासाठी महारेरा नोंदणी करण्यात आल्याचंही जनमाहिती अधिकाऱ्यांनी लेखी कळवलं आहे.


कारागृहात नाही संगणक, इंटरनेट

कारागृहात मोबाईल, इंटरनेट, संगणक अशी कुठल्याही सोयी कैदी वा आरोपींसाठी उपलब्ध नसतात. अशावेळी शिवप्रसाद केशरी आता त्या बिल्डरविरोधात कशी आॅनलाईन तक्रार करणार हा प्रश्न आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे महारेराला ग्राहक, नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून तक्रारीचं प्रमाण वाढत आहे. तर तक्रारीसाठी सर्वच जण कसे पुढं येत आहेत हे ही यातून स्पष्ट होत आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे महारेराच्या कारभारातील पारदर्शकताही यानिमित्तानं समोर येत आहे.

न्यायालयाची परवानगी लागणार

शिवप्रसाद केशरीला आता महारेरात तक्रार करता येणं शक्य होईल का यासंबंधी पोलिस महानिरीक्षक कारागृह राजवर्धन सिन्हा यांच्याशी मुंबई लाइव्हनं संपर्क साधला. त्यावेळी सिन्हा यांनी आॅनलाईन तक्रारीसाठी कैद्यांना वा आरोपींना इंटरनेट, संगणक वा मोबाईलसारखी कोणतीही सुविधा उपलब्ध नसते वा उपलब्ध करून ही देता येत नाही. त्यामुळं जर संबंधीत आरोपीला आॅनलाईन तक्रार महारेरात करायची असेल तर त्याला त्यासंबंधी न्यायालयाकडे परवानगी मागावी लागेल. न्यायालयानं तशी परवानगी दिली तर मग त्याविषयीचा निर्णय पोलिसांना घेता येईल, असं सिन्हा यांनी सांगितलं आहे. तेव्हा आता शिवप्रसाद केशरी पुढं काय करतो हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल.



हेही वाचा - 

लोअर परळ-एल्फिन्स्टनचा 'भाव' पडणार?

म्हाडाची लाॅटरी लटकणार? न्यायालयात याचिका दाखल




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा