Advertisement

कर वसुलीसाठी पालिकेने जप्त केल्या मर्सिडीज, ऑडी

वांद्रे, अंधेरीतील दोन मोठ्या बिल्डरांसह, एक गृहनिर्माण संस्था व हॉटेलच्या मालकीच्या अशा एकून १७ गाड्या गुरूवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या. या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

कर वसुलीसाठी पालिकेने जप्त केल्या मर्सिडीज, ऑडी
SHARES

मागील काही दिवसांपासून मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) मालमत्ता कर (property tax) थकवणाऱ्यांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. थकबाकीदारांच्या वस्तू पालिका जप्त (seized) करत आहे. वांद्रे, अंधेरीतील दोन मोठ्या बिल्डरांसह, एक गृहनिर्माण संस्था व हॉटेलच्या मालकीच्या अशा एकून  १७ गाड्या गुरूवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या. या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. यापैकी काही थकबाकीदारांनी तात्काळ ५ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. 

पालिकेने जप्त केलेल्या गाड्या ७ दिवसात कर भरून थकबाकीदारांनी सोडवून न नेल्यास त्यांचा लिलाव (auction) करण्यात येणार आहे. जप्त (seized) केलेल्या गाड्यांमध्ये मर्सिडीज, ऑडी, होन्डा सिटी, स्कोडा, हुंदाई क्रेटा, इनोव्हा अशा  उच्च श्रेणीतील गाड्या आहेत. हुंदाई क्रेटा, ऐकॉर्ड, टोयोटा काम्री अशा तीन गाड्या वांद्रे पश्चिममधील बिल्डर समीर भोजवाणी यांच्या आहेत. तर, ऑडी आणि मर्सिडीज गाड्या अंधेरी पश्चिमेतील लष्करीया बिल्डर्सच्या तर साई ग्रुप कंपनीजची ऑडी, शेवरलेट क्रुझ या गाड्या आहेत.  वांद्रे पश्चिम येथील फेलीक्स गेराल्ड अॅण्ड क्लारा या गृहनिर्माण संस्थेच्याही २ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

मालमत्ता कराची (property tax) वसुली अपेक्षेप्रमाणे न झाल्याने पालिकेचे आर्थिक गणित डळमळीत झाले आहे. चालू आर्थिक वर्षात ५५०० कोटींचा मालमत्ता कर मिळवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. मात्र, फेब्रुवारी अखेरपर्यंत फक्त ३१५४ कोटी रुपयेच वसूल झाले आहेत. त्यामुळे थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय पालिकेने (Mumbai Municipal Corporation) घेतला आहे. थकबाकीदारांचे घर तसंच कार्यालयातील फर्निचर, कम्प्युटर, वाहनं ताब्यात घेतली जात आहेत.

गाड्या जप्त केल्यानंतर अनेक थकबाकीदारांनी मालमत्ता कर (property tax) भरून आपल्या गाड्या सोडवून घेतल्या.  फेलीक्स गेराल्ड अॅण्ड क्लारा यांनी सर्व ६५ लाख रुपयांची थकबाकी भरली. शमा बिल्डर्स यांनी ३ कोटी ७९ लाखांपैकी १ कोटी ९० लाख रुपये, नरोज डेव्हलपर्सने १ कोटी ६ लाखांपैकी ७८ लाख, लष्करीया बिल्डर्सने ८० लाखांपैकी ५० लाख, ईसीएच सिल्क मिल्सने १ कोटी ९० लाखांपैकी ५० लाख आणि दर्शन टॉवर्सने ७२ लाखांपैकी ४६ लाख रुपये भरले आहेत. 



हेही वाचा -

आवश्यकता भासल्यास 'कस्तुरबा'मध्ये खाटांची संख्या १०० पर्यंत

Coronavirus Updates: कोरोनाच्या धसक्याने शिर्डीतली गर्दीही घटली!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा