Advertisement

आवश्यकता भासल्यास 'कस्तुरबा'मध्ये खाटांची संख्या १०० पर्यंत

कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेत मुंबई महापालिका प्रशासन सज्ज झालं आहे.

आवश्यकता भासल्यास 'कस्तुरबा'मध्ये खाटांची संख्या १०० पर्यंत
SHARES

कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेत मुंबई महापालिका प्रशासन सज्ज झालं आहे. महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात करोना वार्डची निर्मिती करण्यात आली आहे. तसंच, रुग्णालयात असलेल्या विशेष विभागात खाटांची संख्या २८ वरून ५० पर्यंत नेण्यात आली. त्याचप्रमाणं, आवश्यकता भासल्यास ती १०० पर्यंत नेली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेनं सर्व तयारी केली आहे. मुंबईकरांनी काळजी घ्यावी, मात्र घाबरण्याची आवश्यकता नाही, असे आवाहनही पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

मुंबईत करोनाची लागण झालेल्या दोन्ही रुग्णांची प्रकृती सुधारत असून, या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना व ३ निकटवर्तीयांना करोनाची लागण झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. आत्तापर्यंत १९० संशयित रुग्णांपैकी १८८ रुग्णांची चाचणी नकारात्मक आली आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या (Health Department) ३ पथकांनी बुधवारी रात्री वस्ती पातळीवर सर्वेक्षण केलं. १०६ घरांपर्यंत हे पथक पोहोचलं. या पथकांनी केलेल्या तपासणी अहवालात त्यातील कोणालाही करोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) १८ जानेवारी ते १२ मार्चपर्यंत परदेशातून आलेल्या १ लाख ९६ हजार ७६२ नागरिकांची वैद्यकीय तपासणी (Medical Test) करण्यात आली आहे.

यापैकी १९० संशयित नागरिकांना कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १८८ नागरिकांचे तपासणी अहवाल नकारात्मक आले असून, केवळ २ जणांचा अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळं त्यांना तात्काळ कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे.

महापालिकेच्या केईएम, नायर, सायन आणि १७ सर्वसाधारण रुग्णालये याठिकाणीही करोनासंदर्भातील रुग्णांसाठी काही बेड, डॉक्टर, नर्स आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेनं ३०० खासगी, सरकारी, पालिका रुग्णालयांतील डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांना करोनावर उपचार करण्यासाठी विशेष प्रशिक्षण (Special Training) दिले आहे.

करोनाबाबत संशयित रुग्ण काही खासगी रुग्णालयात उपचारासाठी व मार्गदर्शनासाठी गेले असता त्या रुग्णालयांनी महापालिका आरोग्य विभागाला संपर्क करून विचारणा केली. त्यामुळं महापालिकेनं काही खासगी रुग्णालयांतील (Private Hospital) डॉक्टर, नर्स यांनाही प्रशिक्षण दिले. तसेच यापुढे खासगी रुग्णालयांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video conferencing) मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.



हेही वाचा -

Coronavirus Updates: यंदाची IPL रद्दच करा, केंद्राची BBCI ला सूचना

Coronavirus Updates: कोरोनाच्या धसक्याने शिर्डीतली गर्दीही घटली!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा