Advertisement

कचरा वर्गीकरण करणाऱ्या सोसायट्यांची पालिका ठेवणार नोंद

मुंबईत (mumbai) रोज हजारो मेट्रिक टन कचरा (Garbage) जमा होतो. वाढत्या कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी मुंबई महापालिका (mumbai municipal corporation) सोसायट्यांना ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे.

कचरा वर्गीकरण करणाऱ्या सोसायट्यांची पालिका ठेवणार नोंद
SHARES

मुंबईत (mumbai) रोज हजारो मेट्रिक टन कचरा (Garbage) जमा होतो. वाढत्या कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी मुंबई महापालिका (mumbai municipal corporation) सोसायट्यांना ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. पालिका ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याऱ्या सोसायट्यांना मालमत्ता करात ५ टक्के सवलत देत आहे. मात्र,  प्रत्यक्षात किती गृहनिर्माण सोसायट्या कचऱ्यावर प्रक्रिया करतात, याची पालिकेकडं अचूक नोंद नाही. याची नोंद ठेवण्यासाठी महापालिका प्रत्येक सोसायट्यांच्या प्रवेशद्वारावर क्यूआर कोड स्टिकर लावणार आहे. 

 क्यूआर कोड स्टिकर लावण्यास मुलुंडमधून सुरूवात केली जाणार आहे. मुंबईतून रोज ७ हजार मेट्रिक टन कचरा (Garbage) उचलण्यात येतो.  वाढत्या कचऱ्याचं प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेने ओल्या व सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणावर भर दिला. पालिका ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याऱ्या सोसायट्यांना मालमत्ता सवलत देत आहे.  मात्र, कोणत्या सोसायटीमधून किती कचरा उचलला जातो? त्यात ओला व सुका कचरा किती? कचऱ्यावर प्रक्रिया कुठे होते? याबाबत कोणतीही नोंद ठेवण्यात आलेली नाही. ही नोंद ठेवण्यासाठी पुढील आठवड्यापासून पालिकेचे अधिकारी मुलुंड विभागातील प्रत्येक सोसायटीची पाहणी करणार आहेत.

मुलुंड विभागात २ हजार सोसायट्या आणि ५० छोट्या झोपडपट्ट्या आहेत. मुलुंड विभागातून रोज १३५ मेट्रिक टन कचरा उचलला जातो. या विभागातील सोसायट्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कर्मचारी -अधिकारी जाऊन माहिती घेणार आहेत. मुंबईत रोज जमा होणारा कचरा देवनार आणि कांजूरमार्ग कचरा भूमीवर टाकण्यात येतो. के पश्चिम हा सर्वात मोठा विभाग असून यामध्ये अंधेरी लोखंडवाला, वर्सोवा आणि जुहू या भागांचा समावेश आहे. या भागातून दररोज ४०० मेट्रिक टन कचरा उचलला जातो.



हेही वाचा -

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा