Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

पालिकेच्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनाही हवा ५ दिवसांचा आठवडा

अत्यावश्यक विभाग वगळून मुंबई महापालिकेच्या (mumbai Municipal Corporation) इतर विभागातील कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा (5 days week) लागू करण्यात आला आहे. त्यानंतर आता अत्यावश्यक विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही ५ दिवसांचा आठवडा हवा आहे.

पालिकेच्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनाही हवा ५ दिवसांचा आठवडा
SHARES

अत्यावश्यक विभाग वगळून मुंबई महापालिकेच्या (mumbai Municipal Corporation) इतर विभागातील कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा (5 days week) लागू करण्यात आला आहे. त्यानंतर आता अत्यावश्यक विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही ५ दिवसांचा आठवडा हवा आहे. आरोग्य, सफाई खाते, पाणीपुरवठा, देखभाल अशा अत्यावश्यक विभागांतील कर्मचाऱ्यांनी याची मागणी केली आहे. कामगार संघटनांनीही याला पाठिंबा दिला आहे. 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा (5 days week) लागू केल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनांही मागील आठवड्यात ५ दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश नाही. राज्य सरकारमध्ये प्रशासकीय कर्मचारी मोठय़ा प्रमाणावर आहेत. पण पालिकेत अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आरोग्य, घनकचरा, पाणीपुरवठा अशा खात्यांतील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

 पालिकेमध्ये अत्यावश्यक सेवांतर्गत परिचारिका, डॉक्टर, तंत्रज्ञ, घनकचरा विभाग, पाणीपुरवठा विभाग आदी विभागात मोठ्या संख्येने कर्मचारी आहेत. या सर्वांना ५ दिवसांचा आठवडा (5 days week) मिळणार नाही.  मात्र या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांनी सुट्टी दिली पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचं पालिकेच्या कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीचे अ‍ॅड. प्रकाश देवदास यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सार्वजनिक सेवेवर परिणाम होऊ नये म्हणून पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्यक आहे किंवा पाच दिवसांनी दोन दिवसांची सुट्टी कामगारांच्या खात्यात जमा करावी व त्यांना ती त्यांच्या सोयीने घेण्याची मुभा असावी, असा मार्ग त्यांनी सुचवला आहे. 


हेही वाचा -

बीकेसीतील प्रदुषणप्रकरणी एमएमआरडीएची ४० कंत्राटदारांना नोटीस

कोरोना व्हायरसबाबत महापालिकेचं अफवा पसरवणारं पोस्टर
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा