Advertisement

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मुंबईकरांना हायड्रोक्लोरोक्वीनचा डोस

मुंबई महापालिकेतर्फे वरळी आणि धारावी भागातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हायड्रोक्लोरोक्वीनचा डोस देण्यात येणार आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मुंबईकरांना हायड्रोक्लोरोक्वीनचा डोस
SHARES

मुंबई महापालिकेतर्फे  वरळी आणि धारावी भागातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हायड्रोक्लोरोक्वीनचा डोस देण्यात येणार आहे.  वरळी, लोअर परेल, धारावी, दादर ही ठिकाण कोरोनाचे हॉटस्पॉट बनली आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना हायड्रोक्लोरोक्वीनचा डोस देण्यात येणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

वय वर्ष 18 ते 55 वयोगटातील निरोगी नगारिकांना हा डोस दिला जाणार आहे. ज्या लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार यासारखे आजार नाही, त्यांना या गोळ्या दिल्या जाणार आहे. या दाट लोकसंख्येच्या भागातील गर्दी आणि संसर्गाची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हे औषध दिलं जाणार आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. धारावीतील 50 हजार आणि वरळीतील 50 हजार नागरिकांपैकी ज्यांना आजार नाही त्यांना आजपासून या गोळ्या दिल्या जाणार आहेत, असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. 

मुंबई महापालिकेने आरोग्य सेवेत काम करणाऱ्या 1 लाख कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीही घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचे कर्मचारी रात्रं-दिवस काम करत आहे. गरज पडल्यास हे कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये काम करताना दिसत आहेत.



हेही वाचा -

लॉकडाऊन वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेला 17.58 लाख कोटींचा फटका

दादरमध्ये आणखी २ जण कोरोनाग्रस्त

कोरोनाचे धारावीत ५ नवे रुग्ण




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा