Advertisement

मुंबईतील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी वापरणार 'हे' नवे तंत्रज्ञान

या तंत्रज्ञानामुळे अत्याधुनिक पद्धतीने कचऱ्याचं वर्गीकरण करून विघटन केलं जाणार आहे. ही प्रक्रिया वेगाने करता येणार आहे.

मुंबईतील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी वापरणार 'हे' नवे तंत्रज्ञान
SHARES

मुंबई (mumbai) मध्ये रोज जमा होणाऱ्या कचऱ्याची (Garbage) विल्हेवाट लावणं हे मुंबई महापालिकेसमोर (Mumbai Municipal Corporation)  मोठं आव्हान आहे. मुंबई महापालिका आता घरातील ओल्या आणि सॅनिटरी नॅपकीन (Sanitary napkins) सारख्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी 'प्लाझ्मा' (Plasma) हे नवीन तंत्रज्ञान (Technology) आणणार आहे. या तंत्रज्ञानामुळे अत्याधुनिक पद्धतीने कचऱ्याचं वर्गीकरण करून विघटन केलं जाणार आहे. ही प्रक्रिया वेगाने करता येणार आहे. पालिका मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये प्लाझ्मा तंत्रज्ञानांची यंत्रणा उभारणार आहे. 


प्लाझ्मा  (Plasma) तंत्रज्ञानाने (Technology)  रोज ४ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.  मुंबईत रोज ६८०० मेट्रिक टन कचरा (Garbage) जमा होतो. यातील  ५००० मेट्रिक टन कचऱ्यावर कांजुरमार्ग (kanjurmarg) येथे बायोरिअॅक्टर (Bioreactor) या शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते. तर देवनार डम्पिंग ग्राऊंड (Deonar dumping ground) मध्ये १८०० मेट्रिक टन कचऱ्याची पारंपरिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येते. मात्र, मुंबईत काही प्रमाणात ओला आणि सुका कचरा एकत्रच जमा होतो. यामध्ये जमा होणाऱ्या ओल्या आणि सॅनिटरी पॅडसारख्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्लाझ्मा तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे.


या कामासाठी मे. हिंदुस्थान इंजिनीअरिंग कॉर्पोरेशनला कंत्राट देण्यात येणार आहे. यासाठी ६ कोटी ८६ लाख ९० हजार रुपये खर्च होणार आहेत. यामध्ये कंत्राटदाराला शहर आणि दोन्ही उपनगरांत प्रत्येकी एक 'प्लाझ्मा' (Plasma) यंत्रणा उभारून काम करावे लागेल. या कामाचा कालावधी एक वर्षाचा असेल. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीत (Standing Committee) मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. 


सॅनिटरी पॅडसारख्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न गंभीर असून हा कचरा उघड्यावर जाळताही येत नाही. मात्र बंदीस्त व्यवस्थेत कचऱ्यावर (Garbage) क्‍युलर सेपरेशन, लिक्विड रूपांतर, वायू स्वरूप आणि त्यानंतर प्लाझ्मा (Plasma) तंत्रज्ञानाद्वारे कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. यात चुंबकीय पद्धतीने उच्च दाबाने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे प्रदूषणाचा धोकाही टळेल. 


  • मुंबई महापालिका आता घरातील ओल्या आणि सॅनिटरी नॅपकीन (Sanitary napkins) सारख्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी 'प्लाझ्मा' (Plasma) हे नवीन तंत्रज्ञान (Technology) आणणार आहे. 

  • ओल्या आणि सॅनिटरी पॅडसारख्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्लाझ्मा तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे.

  • प्लाझ्मा  (Plasma) तंत्रज्ञानाने (Technology)  रोज ४ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.  

  • या कामासाठी मे. हिंदुस्थान इंजिनीअरिंग कॉर्पोरेशनला कंत्राट देण्यात येणार आहे. 

  • कंत्राटदाराला शहर आणि दोन्ही उपनगरांत प्रत्येकी एक 'प्लाझ्मा' (Plasma) यंत्रणा उभारून काम करावे लागेल. 


हेही वाचा -

मोबाइलवरून करता येणार पाण्याच्या मीटरचं रिडींग

मंगळवारी पालिका सादर करणार अर्थसंकल्प

३ वर्षांत २५ जलवाहिन्या फुटल्या, मेट्रो कामाचा मुंबईकरांना मनस्ताप

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा