Advertisement

7 महिन्यात 400 मॅनहोल्सची झाकणं चोरीला

याप्रकरणी 50 FIR दाखल करण्यात आली आहे.

7 महिन्यात 400 मॅनहोल्सची झाकणं चोरीला
SHARES

जानेवारी ते जुलै दरम्यान सुमारे 400 मॅनहोल कव्हर चोरीला गेले आहेत. पालिकेने यासाठी 50 FIR दाखल केले आहेत. एका महिन्यात सरासरी 57 चोरीच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात मृत्यूचे सापळे बनणारे उघडे मॅनहोल झाकण्यात अयशस्वी झाल्याबद्दल हायकोर्टाने पालिकेला अनेकदा फटकारले आहे. 

कास्ट आयर्नपासून बनविलेले मॅनहोल कव्हर्स वारंवार चोरीला जातात. कारण चोर आणि गरदुल्ले 3,000 ते 5,000 रुपयांपर्यंत  मार्केटमध्ये हे मॅनहोल्सची झाकणं विकतात. प्रशासकिय आकडेवारीनुसार, 2022 मध्ये 836 मॅनहोल कव्हर चोरीला गेले होते, जे गेल्या चार वर्षांतील सर्वाधिक होते.

मॅनहोल कव्हर चोरीची प्रकरणे पोलिसांना कळवण्यास सुरुवात केल्यावर BMC जूनपासून अॅक्शन मोडमध्ये आली. भंगार विक्रेत्यांनी चोरीची कव्हर खरेदी केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही महापालिकेने दिला आहे. "तथापि, तक्रारी बहुतेक अज्ञात व्यक्तींविरुद्ध नोंदवल्या जातात, ज्यांना पोलिसांकडून क्वचितच पकडले जाते," असे एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्याने सांगितले.

मागील वर्षांत चोरीला गेलेली कव्हर

2019: 386

2020: 458

2021: 564

2022: 836



हेही वाचा

पश्चिम रेल्वेवरील 15 कोचच्या लोकल ट्रेनचे वेळापत्रक जाहीर

मुंबईकरांनो सावधान! जुहू चौपाटीवर जाताय तर काळजी घ्या

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा