Advertisement

मुंबईकरांनो सावधान! जुहू चौपाटीवर जाताय तर काळजी घ्या

जुहू चौपाटीवर जाणाऱ्या मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

मुंबईकरांनो सावधान! जुहू चौपाटीवर जाताय तर काळजी घ्या
SHARES

मुंबईच्या जुहू चौपाटीवर गेल्या काही दिवसांपासून जेलीफिश आढळत आहेत. चौपाटीवर आलेल्या सहा जणांना या माशांनी दंश केल्याची घटना रविवारी घडली. यामध्ये चार ते सहा वयोगटातील दोन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. त्यामुळे जुहू चौपाटीवर जाणाऱ्या मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

रविवारी सकाळी ७.१५च्या सुमारास जुहू चौपटीवरसहा जणांना जेलिफिशने दंश केला. मेहताब शेख (२०), दिक्षाद मेहता (५), मोहम्मद मसुरी (४), मेटवीश शेख (६), मोहम्मद राजौल्लाह (२२) आणि आराथ्रीहा प्रमूह (२५) अशी त्यांची नावे आहेत. कूपर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.

जूहू चौपटीवर फिरण्यासाठी गेलेल्या मुंबईकर, तसेच पर्यटकांना गेल्या काही दिवसांपासून जेलीफिश पाहण्यास मिळत आहेत. ते बूट, पायाला चिकटत असल्याने पर्यटकांना सावधानतेचा इशारा देत, पावसाळ्यात समुद्रावर कोणीही जाऊ नये, असे आवाहन याआधीही पालिकेने केले होते. तरीही अनेक जण समुद्रकिनाऱ्यावर जात असतात. 

चौपाटीवर जेलीफिश आढळत असून येथे येणाऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन मेगाफोनद्वारे सतत केले जाते. मात्र, सायंकाळनंतरही अनेक पर्यटक चौपाटीवर येतात. अंधारात जेलीफिश किनाऱ्यावर असल्याचा अंदाज त्यांना येत नाही. त्यामुळे अनेकांना दंश होण्याच्या घटना घडत आहेत.



हेही वाचा

वांद्रेतील प्रसिद्ध धाब्यातील जेवणाच्या थाळीत मेलेला उंदीर सापडला

मोटरमनच्या डब्यात आता 'ऑडिओ अलर्ट युनिट' यंत्रणा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा