वांद्रेतील प्रसिद्ध धाब्यातील जेवणाच्या थाळीत मेलेला उंदीर सापडला

वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वांद्रेतील प्रसिद्ध धाब्यातील जेवणाच्या थाळीत मेलेला उंदीर सापडला
SHARES

वांद्रे येथील एका ढाब्यात चिकनच्या ताटात मृत उंदीर आढळून आला. या संदर्भात वांद्रे पोलिसांनी ढाबा व्यवस्थापक, आचारी आणि चिकन पुरवठादाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार अनुराग सिंग (४०) हा मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. सध्या मुंबईत कामानिमित्त राहतो. तो एका बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. मित्रासोबत ते वांद्रे येथील एका प्रसिद्ध ढाब्यावर जेवायला गेले होते. त्यांनी मटण आणि चिकन थाळीची ऑर्डर दिली.

जेवताना त्यांना त्यांच्या चिकनच्या ताटात मेलेला उंदीर दिसला. त्यांनी ढाब्याचे व्यवस्थापक विवियन अल्बर्ट शिकेरश (४०) यांना विचारणा केली असता त्यांनी अस्पष्ट उत्तरे दिली. अखेर सिंग यांनी याप्रकरणी वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली.

त्यानुसार पोलिसांनी फिर्यादीच्या अन्नात मेलेले उंदीर टाकून जीव धोक्यात घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ढाब्याचा व्यवस्थापक आणि स्वयंपाकी यांना अटक केली.



हेही वाचा

ताडदेव : दरोडा टाकलेल्या घराची मंगल प्रभात लोढांकडून पाहणी

नितीन देसाईंच्या ऑडिओ क्लिपमधून धक्कादायक माहिती उघड, कोणी दिला त्रास?

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा