नितीन देसाईंच्या ऑडिओ क्लिपमधून धक्कादायक माहिती उघड, कोणी दिला त्रास?

एका मराठी कलाकाराला जीवे मारण्याचे काम या नराधमांकडून होत आहे, असे या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटल्याचा दावा केला जातोय.

नितीन देसाईंच्या ऑडिओ क्लिपमधून धक्कादायक माहिती उघड, कोणी दिला त्रास?
SHARES

ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai Death) यांनी आत्महत्या करण्यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिपची माहिती आता समोर आली आहे. लोकशाही चॅनलने या संदर्भातील ऑडिओ क्लिपचा खुलासा केला आहे. 

एडेलवाईस कंपनीचे अध्यक्ष रशेष शाह आणि अन्य तीन जणांवर देसाईंनी गंभीर आरोप केले आहेत. 

काय आहे नितीन देसाईंच्या शेवटच्या ऑडीओ क्लिपमध्ये?

रशेष शाहा हा गोडबोल्या असून तो छोट्या-मोठ्या उद्योजकांसाठी कष्टानं बनवलेला माझा स्टुडिओ गिळण्याचं काम केलं. 100 फोन केले पण फोन उचलत नाही. 138 इओडब्लू, एनसीएलटी, बीआरटी, यांच्याकडून प्रचंड छळवाद केला. माझ्याकडे दोन तीन इन्व्हेस्टर, गुंतवणूक करण्यासाठी तयार असताना मला सहकार्य केलं नाही. माझ्यावर डबल टिबल किंमतीचा बोजा टाकून प्रेशराईज केले.

स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माझ्यावर वेगळ्या पद्धतीनं प्रेशर करुन, मी दिलेल्या गोष्टी मान्य करीत नाही. स्मित शाह, केयूर मेहता, आर के बन्सल यांनी माझा स्टुडिओ लुटण्याचा माझी नाचक्की करुन मला घेरण्याचे काम करीत आहे. या लोकांनी माझी वाट लावली आहे. मला पैशाच्या बाबतीत धमक्या देऊन नराधमांनी मला प्रेशराईज केले. सोन्यासारखे असलेले ऑफिस विकायला लावले. एका मराठी कलाकाराला जीवे मारण्याचे काम या नराधमांकडून होत आहे. मला षडयंत्र करुन दडपून टाकून मला संपवले. माझ्या मनात नसतानाही, त्यांनी करायला भाग लावलेले आहे.

गुन्हा दाखल

दरम्यान, नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालापूर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फायनान्स कंपनी/ एडलवाईंज ग्रुपचे पदाधिकारी व इतर असे एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नितीन देसाई यांच्या पत्नीने कर्ज वसुलीसाठी छळ केल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा