Advertisement

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात लवकरच बॅटरीवर धावणारी वाहने येणार

एका वाहनात आठ जणांसाठी आसन व्यवस्था असून अशी चार वाहने महिनाभराच्या कालावधीत वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात लवकरच बॅटरीवर धावणारी वाहने येणार
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (Veermata Jijabai Bhosale Udyan And Zoo) लवकरच बॅटरीवर धावणारी वाहने पहायला मिळणार आहे.

बॅटरीवरील चार वाहनांची सुविधा महिनाभराच्या आत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे लहान मुले, दिव्यांग आणि वृद्धांना देखील उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात सहजपणे सफर करता येईल. आठ आसनी ही वाहने असतील.  

महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, उपायुक्त (उद्याने)  किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे विस्तारिकरण, पर्यटकांसाठी नवनवीन आकर्षणे आदींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. 

जवळपास 53 एकर परिसरात हे वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय विस्तारले आहे. प्राणिसंग्रहालयातील पक्षी, प्राणी पाहण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यामध्ये लहान मुलांसह वृद्ध व्यक्तींचा देखील समावेश असतो. त्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि दिव्यांग व्यक्ती यांना देखील उद्यानाचा संपूर्ण परिसर विनासायास पाहून आनंद घेता यावा यासाठी बॅटरीवर धावणाऱ्या वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.   

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच एका कार्यक्रमानिमित्त वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी संपूर्ण प्राणिसंग्रहालयाची पाहणी केली. प्राणिसंग्रहालयातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या पर्यटकांची व उपक्रमांची माहिती त्यांना देण्यात आली. या भेटीदरम्यान त्यांनी लहान मुले, दिव्यांग आणि वृद्धांना प्राणिसंग्रहालयात फिरण्याकरिता पर्यावरणपूरक वाहनाची सोय करण्यात यावी, अशा सूचना दिल्या.

चारही वाहने उद्यान सुरू असणाऱ्या वेळेत म्हणजे सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 या वेळेत वय 3 ते 12 वर्षांपर्यंतची मुले यांच्यासह वृद्धांकरिता देखील उपलब्ध असणार आहेत. सदर वाहनांची खरेदी करण्यासाठी मुंबई शहर जिल्हा नियोजन अधिकारी यांचेकडून निधी हस्तांतरीत केला जाणार आहे.

एका वाहनात आठ जणांसाठी आसन व्यवस्था असून अशी चार वाहने महिनाभराच्या कालावधीत वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या वाहन सुविधेच्या शुल्काबाबतचा धोरणात्मक निर्णय अद्याप झालेला नाही.हेही वाचा

मीरा-भाईंदरमधील या चार तलावांवर उभारणार म्युझिकल फाऊंटन

ब्रिटीशकालीन तोफांचा इतिहास आता उद्यानांमध्ये उलगडणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा