Advertisement

मरीन ड्राईव्हवरील सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाला स्थानिकांचा विरोध

स्थानिक नागरिक म्हणाले, गरज पडल्यास पालिकेविरोधात मोर्चाही काढू.

मरीन ड्राईव्हवरील सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाला स्थानिकांचा विरोध
file photo
SHARES

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे पालिकेकडून बांधण्यात येत असलेल्या शौचालयांच्या विरोधात स्थानिक आक्रमक झाले आहेत. स्थानिक नागरिकांकडून याचा निषेध करण्यात येत आहे.

मरीन ड्राइव्हच्या नरिमन पॉइंटवर पालिकेकडून हे शौचालय बांधले जात आहे. स्वच्छतागृहामुळे या ठिकाणचे हेरिटेज लुक हरवून बसणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यासोबतच समाजकंटकांचा जमाव जमण्याची शक्यता आहे.

विव्हिंग डेकही उभारणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिसराला भेट दिल्यानंतर पालिकेने शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक एक किलोमीटरवर सार्वजनिक शौचालये बांधण्याचे आदेश दिले होते. सार्वजनिक स्वच्छतागृहांसह पालिका विव्हिंग डेक आणि सी साइड प्लाझाही बांधणार असल्याचे मानले जात आहे. 

पालिकेला लिहले पत्र

दादर आणि गिरगाव चौपाटीवर पालिकेनेे बांधल्याचाही मुद्दा स्थानिक रहिवासी संघटनेने उपस्थित केला आहे. मरिन ड्राईव्ह सिटिझन्स असोसिएशनचे अशोक गुप्ता यांनी यासंदर्भात पालिकेच्या ए वॉर्डच्या अधिकाऱ्याला पत्र लिहिले आहे.

पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे बनवण्यात आम्हाला कोणतीही अडचण नसून स्वच्छतागृहांसाठी जागा निवडण्यात आल्याचे त्यांनी पत्रात लिहिले आहे. त्यावर आमचा आक्षेप आहे. पालिकेने असे कोणतेही पाऊल उचलताना स्थानिक नागरिकांनाही विश्वासात घेतले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. जेणेकरून आमचा सल्लाही घेता येईल आणि संसाधनांचा योग्य वापर करता येईल. यासोबतच लोकांना कोणतीही अडचण येऊ नये.

शौचालयाला विरोध का? 

मरीन ड्राईव्ह असोसिएशनचे आणखी एक सदस्य सुरेश छाब्रिया एका वृत्तपत्राला म्हणाले की, विहाराच्या ठिकाणी शौचालये बांधली तर त्याचे सौंदर्य कमी होईल आणि डोळ्यांना त्रास होईल. हे स्वच्छतागृह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे आश्रयस्थान बनू शकते, अशी भीतीही आम्हाला वाटते. गरज पडल्यास पालिकेविरोधात मोर्चाही काढू, असेही ते म्हणाले.

मात्र, या प्रकरणी पालिकेचे अधिकारी शिवदास गुरव म्हणाले की, सीएसआर निधीतून आणखी एक शौचालय बांधले जात आहे. जे आधीपासून अस्तित्वात असलेल्या शौचालयापासून काही अंतरावर असेल. ते म्हणाले की, स्थानिक नागरिकांनी यापूर्वी शौचालयातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली होती. जी नंतर दुरुस्त करण्यात आली.



हेही वाचा

वांद्रे, सांताक्रूझसह 'या' भागातील पाणीपुरवठा ४ जूनपासून प्रभावित

निष्क्रिय सोसायटी सदस्यांना मतदान करण्यास, निवडणूक लढवण्यास बंदी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा