Advertisement

वांद्रे, सांताक्रूझसह 'या' भागातील पाणीपुरवठा ४ जूनपासून प्रभावित

4 जून ते 8 जून गळती शोधण्याचे काम केले जाईल आणि दुरुस्तीची कामे हाती घेतली जातील.

वांद्रे, सांताक्रूझसह 'या' भागातील पाणीपुरवठा ४ जूनपासून प्रभावित
(Representational Image)
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) बुधवारी, 31 मे रोजी उपनगरातील अनेक भागांमध्ये चार ते पाच दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची घोषणा केली.

एका अधिकृत निवेदनात, पालिकेने म्हटले आहे की, पाणी पुरवठा वाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे वांद्रे (पूर्व), वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) वॉर्डसह अनेक भागात 4-8 जून दरम्यान कमी दाबाचा पुरवठा होणार आहे.

या कालावधीत (4 जून ते 8 जून) गळती शोधण्याचे काम केले जाईल आणि दुरुस्तीची कामे हाती घेतली जातील. यासोबतच सांताक्रूझ परिसरात दोन प्रमुख तपासणीची कामेही केली जाणार आहेत. त्यामुळे, संपूर्ण एच/पूर्व प्रभागात पाण्याचा कमी दाब जाणवेल, असे निवेदनात म्हटले आहे.

मुंबई आणि त्याच्या उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक असलेल्या वैतरणा तलावातून पश्चिम उपनगरातील काही भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनींपैकी एका जलवाहिनीतील गळतीच्या दुरुस्तीचे काम पालिकेच्या हायड्रॉलिक विभाग हाती घेणार आहे.

एच/ई वॉर्डमध्ये वांद्रे, खार, सांताक्रूझ, सीएसटी रोडचा काही भाग, विलेपार्ले, माहीम आणि धारावीचा पूर्व भाग प्रभावित होणार आहे. 



हेही वाचा

लक्ष द्या! शुक्रवारी ठाण्यातील 'या' भागात पाणीपुरवठा बंद

मुंबईच्या तुंबईवर सीसीटीव्हीची नजर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा