Advertisement

दिलासादायक! मुंबईत पुन्हा शून्य मृत्यूची नोंद; 'इतक्या' खाटा रिकाम्याच

मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढत आहे. हा वाढत कोरोना त्रासदायक असला तरी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

दिलासादायक! मुंबईत पुन्हा शून्य मृत्यूची नोंद; 'इतक्या' खाटा रिकाम्याच
SHARES

मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढत आहे. हा वाढत कोरोना त्रासदायक असला तरी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबईत कोरोना संसर्ग अधिक असला तरी ९० टक्के खाटा रिक्त आहेत. मुंबईत गेल्या २४ तासांत करोनाच्या ८०६३ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने चिंता वाढली आहे. २७ डिसेंबरला मुंबईत करोना रुग्णांची संख्या ८०९ होती. आठवडाभरात रुग्णसंख्या ८ हजारांवर गेली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे रविवारी कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

गृहविलगीकरणात असलेल्या सर्व रुग्णांनी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. त्यातून मुंबईतील विषाणूचा प्रसार शक्य तितक्या लवकर रोखता येईल. घाबरण्याचे कारण नाही, परंतु त्याचवेळी आपण सावध राहून वर्तन केले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य असून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे,' असे आवाहन पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी रविवारी केले.

मुंबईत १ डिसेंबरला १०८ रुग्णांची नोंद झाली होती. तर २१ डिसेंबरला ३२७ रुग्ण सापडले होते. त्यानंतर करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. मागील काही दिवसांपासून दरदिवशी १००० ते २०००च्या संख्येने वाढत गेली. मुंबईत आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या ७ लाख ९९ हजार ५२० वर पोहोचली आहे. तर १६ हजार ३७७ जणांचा मृत्यू झाला आहे.

'मुंबईत ८०६३ नवीन करोना रुग्ण आढळून आले असून त्यातील ८९ टक्के रुग्ण पूर्णपणे लक्षणे नसलेले आहेत. रविवारी आढळलेल्या रुग्णांपैकी ५०३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. ५६ रुग्णांना ऑक्सिजनची सेवा असलेल्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. आजमितीस मुंबईच्या रुग्णालयातील ९० टक्के खाटा रिक्त आहेत,' असे चहल यांनी सांगितले.

अशी वाढली रुग्णसंख्या -

  • २७ डिसेंबर - ८०९
  • २८ डिसेंबर -१३७७
  • २९ डिसेंबर - २५१०
  • ३० डिसेंबर -३६७१
  • ३१ डिसेंबर - ५६३१
  • १ जानेवारी - ६३४७
  • २ जानेवारी - ८०६३
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा