Advertisement

विनामास्क फिरणाऱ्या १०० जणांवर कारवाई करा, पोलिसांना टार्गेट

मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई पोलिसांना सुद्धा कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

विनामास्क फिरणाऱ्या १०० जणांवर कारवाई करा, पोलिसांना टार्गेट
(Representational Image)
SHARES

मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई पोलिसांना सुद्धा कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनानं निर्देश दिल्यानंतर आता मुंबई पोलीस आयुक्तांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला दिवसाला १०० विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या झपाट्यानं वाढत असून आता विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे टार्गेट मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवसाला १०० कारवाया करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत.

मुंबईत ज्यांनी मास्क घातला नसेल त्यांच्याकडून २०० रुपये दंड आकरण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. हे निर्देश मुंबईमधील प्रत्येक पोलीस स्टेशनला देण्यात आले आहेत. मुंबईमध्ये एकूण ९४ पोलीस स्टेशन आहे. दोनशे रुपये दंडातील १०० रुपये हे महानगरपालिकेला जातील तर १०० रुपये पोलीस कल्याण निधीमध्ये जमा केले जाणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुद्धा मुंबई पोलिसांना अशाच प्रकारचे आदेश देण्यात आले होते. सप्टेंबर २०१९ पर्यंत मुंबई पोलिसांनी नऊ कोटी रुपये दंड आकारून जमा केले होते. मात्र लोकांकडून दंड देण्यास खूप वेळा मनाई केली जात आहे. लोकांच्या थेट संपर्कात आल्यामुळे पोलिस दलातील पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची संख्या झपट्यानं वाढत आहे.

जानेवारी २०२० ते मार्च २०२१ पर्यंत ३ लाख ७६ हजार ९१५ नागरिकांवर कोरोनाचे नियम मोडल्याप्रकरणी १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार थांबण्यासाठी दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.



हेही वाचा

मुंबईत गेल्या २४ तासात १२० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

कोविडमुळे मुंबई उच्च न्यायालयानं कामाचे तास कमी केले

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा