Advertisement

MindYourLanguage : मुंबई पोलिसांचं ट्विट व्हायरल, म्हणाले, ” हे चित्रपटातही शोभत नाही”

चित्रपटातील काही संवादाचे फोटो शेअर करताना पोलिसांनी एक संदेशही कॅप्शनमध्ये लिहला आहे.

MindYourLanguage : मुंबई पोलिसांचं ट्विट व्हायरल, म्हणाले, ” हे चित्रपटातही शोभत नाही”
SHARES

मुंबई पोलिसांनी महिलांबद्दल समाजात पसरवण्यात आलेल्या चुकीच्या गोष्टींला विरोध केला आहे. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो असं म्हटलं जातं, मात्र या चित्रपटातून महिलांबद्दल अनेकदा चुकीची वक्तव्य केली जातात.

अगदी आघाडीचे बॉलीवूड अभिनेते असे डायलॉग चित्रपटात बोलतात, की जे त्यावेळी ऐकायला भारी वाटतात, पण खऱ्या आयुष्यात ते स्रियांचा अपमान करणारेच आहेत. असेच काही डायलॉग निवडून मुंबई पोलिसांनी महिलांबद्दलच्या चुकीच्या गोष्टींना नाही म्हणा असं म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांनी या अभियानासाठी इन्स्टाग्राम अकाऊंटचा उपयोग केला आहे. या संवादाचे फोटो शेअर करताना पोलिसांनी एक संदेशही कॅप्शनमध्ये लिहला आहे.

त्यात लिहण्यात आलं आहे की,’ इथं फक्त काही संवाद आहे, ज्यावर आपल्या समाजाला आणि चित्रपटांना विचार करण्याची गरज आहे. त्यामुळेच आपले शब्द काळजीपूर्वक वापरा, आपल्या कृतीवर नियंत्रण ठेवा, असं केलं तर कायद्याला हस्तक्षेप करावा लागणार नाही. आपण वापरत असलेल्या प्रत्येक शब्द उच्चारण्याआधी विचार करा, दैनंदिन जीवनात आणि चित्रपटात वापरलेली भाषा ही आपल्या विचारांचं प्रतिबंबं आहे’ हा संदेश लिहताना पोलिसांनी #LetsNotNormaliseMisogyny #MindYourLanguage #WomenSafety हे 3 हॅशटॅग वापरले आहेत.

चित्रपटातील संवाद?

  • कबीर सिंग

कबीर सिंग अभिनेत्रीला म्हणतो, ”प्रीती, चुन्नी ठीक करो” महिलांना कसं राहावं, कसं वागावं यावर अभिनेता नियंत्रण ठेवताना दिसतो. शिवाय, पुरुषी मानसिकता या संवादातून थेट जाणवते.

  • हम तुम्हारे है सनम

२००२ मध्ये रिलीज झालेल्या हम तुम्हारे है सनम चित्रपटातील दुसरा संवाद आहे, ज्यात अभिनेता शाहरुख खान अभिनेत्रीला म्हणतो, “तुम एक पत्नी हो, तुम्हारा पती जैसा चाहेगा, वैसाही होगा…ये शादी का दस्तूर है, मर्द औरत का भगवान होता है.”


  • मालामाल

१९८८ साली आलेल्या मालामाल चित्रपटातील एक संवादही पोलिसांनी शेअर केला आहे, ज्यात एक पात्र दुसऱ्या पात्राला महिलेबद्दल सांगतं की, “अगर खुबसूरत लडकी को ना छेडो, तो वो भी तो, उसकी बेइज्जती होती है”


  • दिल धडकने दो

२०१५ साली आलेल्या, दिल धडकने दो चित्रपटातील एक संवादही इथं शेअर करण्यात आला आहे, ज्यात अभिनेता त्याच्या बायकोबद्दल बोलताना म्हणतो, “But I allow Ayesha to run her Business” म्हणजे मी आयशाला व्यवसाय चालवण्याची परवानगी देतो. यावरुन आजही महिलांना काही करण्यासाठी पुरुषांची परवानगी घ्यावी लागते हे स्पष्ट दिसतं, याला काऊंटर डायलॉगही चित्रपटात आहे, जो पोलिसांनी इथं दिलेला नाही, मात्र, त्यात या अभिनेत्रीचा आधीचा प्रियकर जो फरहान अख्तर दाखवला आहे, तो म्हणतो, “तू तिला परवानगी देणारा कोण? ती स्वतंत्र आहे आणि ती स्वतंत्रपणे काम करू शकते.”



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा