Advertisement

मुंबई पोलिसांतर्फे मतदान केंद्रांजवळ कडेकोट बंदोबस्त

मतदानाच्या दिवशी सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत मतदान स्थळांभोवती 100 मीटरच्या परिघात काही उपकरणे आणि साहित्य वापरण्यासही या आदेशात निर्बंध घालण्यात आले आहेत.

मुंबई पोलिसांतर्फे मतदान केंद्रांजवळ कडेकोट बंदोबस्त
(File Image)
SHARES

महाराष्ट्रात (maharashtra) 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी (mumbai police) मतदान स्थळांभोवती सुव्यवस्था राखण्यासाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

मिडडेच्या अहवालानुसार, निवडणुकीदरम्यान (maharashtra election 2024) मतदान केंद्राजवळ गर्दी तसेच होणारी कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांतर्फे मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 10 च्या पोटकलम (2) सह हा आदेश काढण्यात आला आहे.

मिड-डेच्या वृत्तानुसार, या आदेशात म्हटले आहे की निवडणूक प्रक्रियेत थेट सहभागी नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला जसे की उमेदवार, ड्युटीवर असलेले प्रशासकीय अधिकारी यांना एकत्र येण्याची किंवा फिरण्याची परवानगी नाही. 

मतदानाच्या दिवशी (Maharashtra Assembly election 2024) सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत मतदान स्थळांभोवती 100 मीटरच्या परिघात काही उपकरणे आणि साहित्य वापरण्यासही या आदेशात निर्बंध घालण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाचे निरीक्षक आणि पोलिस कर्मचारी वगळता इतर कोणासाठीही सेल फोन, वायरलेस उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक संप्रेषणावर बंदी घालण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, या झोनमध्ये लाऊडस्पीकर, मेगाफोन आणि प्रचार बॅनर किंवा पोस्टर्सना परवानगी नाही.



हेही वाचा

शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला मनसेची रॅली

आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा