Advertisement

भिकाऱ्यांना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांची मोहीम

मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे.

भिकाऱ्यांना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांची मोहीम
SHARES

मुबंई पोलिसांनी भिकाऱ्यांना पकडण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. रस्त्यांवरील भिकाऱ्यांना पकडून त्यांना चेंबूरच्या भिक्षेकरी स्वीकार केंद्रात सोडण्यात येणार आहे.

केंद्रात सोडण्यात येणाऱ्यांचं समुपदेशन करून त्यांची योग्य सोय केली जाणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून याबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांकडून भिकाऱ्यांना पकडून त्यांना भिक्षेकरी स्वीकार केंद्रात सोडण्यात येत आहे.

भिकाऱ्यांना पकडल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. नांगरे-पाटलांच्या आदेशानुसार भिकाऱ्यांना पकडण्याची कारवाईही सुरु झाली आहे. त्यानुसार आझाद मैदान पोलिस ठाण्याकडून शनिवारी १४ भिकाऱ्यांना पकडण्यात आलं.

या भिकाऱ्यांना कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करुन त्यांनी भिक्षेकरी स्वीकार केंद्रात सोडण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांची भिकाऱ्यांविरोधातील ही मोहीम पूर्ण फेब्रुवारी महिन्यात हाती घेतली जाणार आहे.

भिक मागण्यासाठी अनेकदा लहान मुलांचा वापर केला जातो. अशाप्रकारे लहान मुलांचा वापर करुन पैसे कमवणाऱ्या टोळ्या मुंबईत तयार झाल्या आहेत. त्यांच्याकडून अनेकदा लहान मुलांचं अपहरण करुन त्यांना भिक मागण्यासाठी भाग पाडलं जातं. त्यामुळे नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई पोलिसांनी भिकाऱ्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे.


हेही वाचा

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी बनून घरात छापा, १ लाख लंपास

राज्यातील 'या' भागांत सर्वाधिक अपघात

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा