Advertisement

राज्यातील 'या' भागांत सर्वाधिक अपघात


राज्यातील 'या' भागांत सर्वाधिक अपघात
SHARES

नियमांचं उल्लंघन केल्यानं राज्यात गतवर्षी २४ हजार ९७१ अपघातांत ११ हजार ५६९ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये रस्ते अपघातांत २४ टक्क्यांनी, तर प्राणांतिक अपघातांमध्ये १० टक्क्यांनी घट झाली आहे. कोरोनामुळे मार्च २०२० ते जून २०२० पर्यंत रस्त्यांवरील वाहन संख्या कमीच होती. त्यामुळे अपघातांचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचा अंदाज महामार्ग पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्यासाठी ‘गोल्डन अवर्स’ महत्त्वाचा ठरतो. अपघातग्रस्तांना त्वरित प्रथमोपचार मिळून त्यांचे प्राण वाचवण्यासाठी महामार्ग पोलिसांनी गावकरी, पेट्रोल पंप, टोल नाके  व ढाब्यावरील कर्मचारी, दुकानदार यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. अपघातातील जखमी व्यक्तीचा रक्तस्राव कापूस, रुमाल किंवा एखाद्या कपड्याने कसा थांबवावा,  वाहन चालकाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर छातीवर विशिष्ट पद्धतीने दाब देणे (पम्पिंग) इत्यादीचे प्रशिक्षण महामार्गांलगत असलेल्या गावकरी, स्थानिकांना देण्यात येणार आहे.

गाव, तालुका इथं असलेल्या दवाखान्यांमधील किंवा सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांची प्रशिक्षण देण्यासाठी मदत घेतली जाणार आहे.जानेवारी ते डिसेंबर २०२० मध्ये २४ हजार ९७१ अपघात झाले आणि त्यात ११ हजार ५६९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९ हजार ९१४ जण जखमी झाले आहेत. सर्वाधिक अपघात आणि अपघाती मृत्यू नाशिक ग्रामीण भागांत झाले असून १ हजार २३९ अपघातांमध्ये ८०१ जणांचा मृत्यू आणि ८२० जण जखमी झाले आहेत.

मुंबई शहरातही अपघातांची संख्या १,८१२ एवढी असून यामध्ये ३४९ जणांचा बळी आणि १,७४० जण जखमी झाल्याची नोंद महामार्ग पोलिसांकडे झाली आहे. २०१९ मध्ये राज्यात एकू ण ३२ हजार ९२५ अपघांत झाले होते आणि १२ हजार ७८८ जणांचा मृत्यू,तर २८ हजार ६२८ जण जखमी झाले होते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा