Advertisement

फ्लोटिंग क्रूझ रेस्टाॅरंटचा मुक्काम चार दिवस समुद्रातच...

फ्लोटिंग क्रूझ बाहेर काढण्यासाठी किमान चार दिवस लागणार असल्याची माहिती एआरके डेक फ्लोटिंग क्रूझ रेस्टाॅरंटच्या तीन मालकांपैकी एक मालक विक्रांत चांदवडकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

फ्लोटिंग क्रूझ रेस्टाॅरंटचा मुक्काम चार दिवस समुद्रातच...
SHARES

शुक्रवारी दुपारी समुद्रात बुडालेलं एआरके डेक फ्लोटिंग क्रूझ रेस्टाॅरंट शनिवारी सकाळी सागरी पोलिस,स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र अजूनही फ्लोटिंग क्रूझ रेस्टाॅरंट समुद्रातच असून ते बाहेर काढण्यासाठी आणखी तीन-चार दिवस लागणार आहेत. कारण फ्लोटिंग क्रूझ बाहेर काढण्याची प्रक्रिया खूप मोठी आणि अवघड असून ही जबाबदारी एआरके डेकच्या मालकांनी एका परदेशी कंपनीवर टाकली आहे. त्यानुसार या कंपनीकडून फ्लोटिंग क्रूझ बाहेर काढण्यासाठी किमान चार दिवस लागणार असल्याची माहिती एआरके डेक फ्लोटिंग क्रूझ रेस्टाॅरंटच्या तीन मालकांपैकी एक मालक विक्रांत चांदवडकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

अजूनही क्रुझ समुद्रातच
भाऊचा धक्का इथं चार महिन्यांच्या मुक्कामासाठी हे फ्लोटिंग क्रूझ रेस्टाॅरंट निघालं असताना ते क्रूझ बुडालं. क्रूझ बुडाल्याबरोबर सागरी पोलिस, स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी क्रूझमध्ये अंदाजे १३ कामगार होते आणि १३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलिस आणि अग्निशमन दलाला यश आलं. तर फ्लोटिंग क्रूझ रेस्टाॅरंट चार महिन्यांसाठी बंद झाल्यानं कुणीही ग्राहक नव्हते, त्यामुळे मोठी जिवितहानी टळली. कामगारांना बाहेर काढेपर्यंत रात्र झाली नि अंधारात क्रूझ बाहेर काढण्याचं काम करण शक्य नव्हतं. त्यामुळे शनिवारी सकाळी क्रूझ बाहेर काढण्यात येईल, असं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं होतं. पण शनिवारी दुपारपर्यंत तरी हे क्रूझ बाहेर काढण्यात आलं नव्हतं. या अऩुषंगानं चांदवडकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी क्रूझ बाहेर काढण्यासाठी किमान चार दिवस लागणार असल्याचं सांगितलं आहे.

परदेशी कंपनी क्रूझ काढणार बाहेर
क्रूझ बाहेर काढण्याची जबाबदारी एआरके डेककडून आंतरराष्ट्रीय स्तरावरील साॅल्वेज या कंपनीला देण्यात आली आहे. या कंपनीच्या एक्सपर्टनी सकाळपासूनच क्रूझची आणि परिस्थितीची पाहणी सुरू केली आहे. त्यानुसार कंपनीचे एक्सपर्ट समुद्रात जावून क्रूझचा कुठला भाग फुटला आहे हे शोधून काढतील. त्यानंतर या भागाची दुरूस्ती करत मग पंपाच्या सहाय्यानं क्रुझमधील पाणी बाहेर काढण्यात येईल. पाणी काढल्याबरोबर क्रूझ पाण्यावर तरंगेल आणि मग क्रूझ किनाऱ्याला आणणं शक्य होईल, असंही चांदवडकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळं चार दिवसानंतर फ्लोटींग क्रूझ रेस्टाॅरंट किनाऱ्याला लागेल. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा