Advertisement

आनंदीदायी आठवणींनी रंगले ज्येष्ठ नागरिकांचे स्नेहसंमेलन


आनंदीदायी आठवणींनी रंगले ज्येष्ठ नागरिकांचे स्नेहसंमेलन
SHARES

मुंबईच्या पोर्ट झोन पोलिसांनी आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरिक स्नेह संमेलनाला परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी उस्पुर्तपणे हजेरी लावली होती. मंगळवारी हा स्नेहसंमेलन सोहळा शिवडी पोलिस ठाणे परिसरात आयोजित करण्यात आला होता. वृद्धासांठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पोलिस कर्मचाऱ्यांनी ही आपल्या कलागुणांना वाव दिली.


वृद्धांच्या मनोरंजनासाठी पोलिसांचा पुढाकार

टीव्हीवरील एका मोबाइल कंपनीच्या जाहिरातीत एक वृद्ध गृहस्थ सतत तरुणांशी मैत्री ठेवून त्यांच्यात रमण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तरुण नसूनही चैतन्य आणि स्फूर्तीची अजिबात कमी नसणारे असे कित्येक ज्येष्ठ नागरिक आपल्या भोवतालीदेखील वावरताना दिसतात. त्यांच्या अंतरंगात दु:ख नसतं असं नसतं. मात्र ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीप्रमाणे ज्येष्ठांच्या समस्याही त्यांच्या वयानुसार आणि कौटुंबिक स्थितीनुसार वेगवेगळ्या असतात. मुळात ज्येष्ठ नागरिकांनी नव्या पिढीकडे मोकळा दृष्टिकोन ठेवून पाहिल्यास आणि तरुणांनीही त्यांना समजून घेतल्यास समस्यांची तीव्रताही कमी होईल


याच उद्देशानं परिसरातल्या वृद्धांसाठी पोर्ट झोनच्या पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला विभागातील नागरिक, विद्यार्थी, पोलिस कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शाळकरी मुलांनी कवितांच्या माध्यमातून आणि पोलिस निरीक्षक नलावडे, पोलिस अंमलदार पाटील यांनी जुन्या हिंदी-मराठी गाण्यांचे सादरीकरण करून ज्येष्ठ नागरिकांचं मनोरंजन केलं


गाण्यावर वृद्धांनी धरला ठेका 

जुन्या आणि नवीन हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांच्या मेजवानीनं ज्येष्ठ नागरिकांना नाचण्याचा मोह आवरता आला नाही. त्यावेळी काही जोडप्यांनी सहपत्नीक स्टेजवर वक्त या हिंदी चित्रपटातील ‘ऐ मेरी जोहरा जबी’ या गाण्यावर ठेका धरला. यातील काही वृद्ध जोडप्यांचा वाढदिवस ही या स्नेहसंमेलनात साजरा करण्यात आला. समवयस्क सवंगड्यांनी घातलेली साद अन् डोळ्यांसमोर तरळलेल्या तरूणपणीच्या आनंददायी आठवणी, अशा भावनिक आणि तितक्याच उत्साही वातावरणात ज्येष्ठ नागरिकांनी सोहळा अनुभवत पोलिसांच्या या कार्यक्रमाचे कौतुक केलं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा