Advertisement

Philately Day : टपाल तिकिटांचे प्रिंट असलेल्या मास्कचं प्रकाशन

भारतीय टपाल खात्याच्या मुंबई कार्यालयात राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त गेल्या ९ ऑक्टोबरपासून विशेष कार्यक्रम साजरे केले जात आहेत.

Philately Day : टपाल तिकिटांचे प्रिंट असलेल्या मास्कचं प्रकाशन
SHARES

१३ ऑक्टोबर हा दिवस फिलेटली दिवस म्हणून साजरा केला जातो. टपाल तिकिटांचा संग्रह आणि अभ्यास करणाऱ्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो.

भारतीय टपाल खात्याच्या मुंबई कार्यालयात राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त गेल्या ९ ऑक्टोबरपासून विशेष कार्यक्रम साजरे केले जात आहेत.

फिलेटली दिनानिमित्त टपाल तिकिटांचे प्रिंट असलेल्या मास्कचे प्रकाशन केलं. या मास्क वर टपाल तिकिटांचे प्रिंट उमटलेले असतील. मुंबई टपाल विभागाचा हा उपक्रम म्हणजे, मास्क अधिक आकर्षक बनवण्याचा आणि सध्याच्या कोविडच्या काळात मास्कचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.

राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त ही या विभागानं विविध उपक्रम आयोजित केले आहेत. आठवड्याचा प्रत्येक दिवस विभागातील वेगवेगळ्या टपाल सेवेला समर्पित आहे.

मुंबई आणि उपनगरात १ हजार ५४९ पोस्टमन कार्यरत आहेत. COVID 19 च्या काळात कुरियर सेवा बंद होती. तेव्हा टपाल कर्मचाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाची कामं केली. याकाळात गरजूंपर्यंत वैद्यकीय साधनं, पीपीई किट्स, पार्सल पोहचवण्याची आदी कामं त्यांनी केलीत.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा