Advertisement

विजांच्या कडकडाटासह मुंबईत पावसाची हजेरी


विजांच्या कडकडाटासह मुंबईत पावसाची हजेरी
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात पावसानं विजांच्या कडकडाटासह दमदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास पावसानं हजेरी लावली असून, दुपारपासून सर्वत्र ढगाळ वातावरण होतं. दरम्यान या आठवड्याच्या शनिवारी व रविवारी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं याआधीच वर्तवला होता. त्यामुळं मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. 


मुंबईत ऑगस्ट महिन्यात पावसानं तुफान बॅटिंग केली. साध्यस्थितीत पावसानं विश्रांती घेतली असून, लवकरच मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. पुढच्या आठवड्यापासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्याशिवाय, या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.


मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून, कोकणातही मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे मान्सून, १७ सप्टेंबरपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्याचा अंदाज आहे.


मान्सूनचा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थानमधून पुढील आठवड्यात सुरू होणार असल्याचा अंदाज आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण उत्तर भारत, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेशमधून परतणार असल्याची शक्यता आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा