Advertisement

मुंबईत मुसळधार पाऊस, सर्वत्र ढगाळ वातावरण


मुंबईत मुसळधार पाऊस, सर्वत्र ढगाळ वातावरण
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. गुरुवारी सकाळपासून सर्वत्र असलेल्या ढगाळ वातावरणामुळं मुंबईकरांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे. सकाळी ऐन कामाला जाण्याच्या वेळी पावसानं हजेरी लावल्यानं अनेक चकरमान्यांचे हाल झाले आहेत. 

मुसळधार पावसामुळं थंड वातावरण निर्माण झालं आहे. मागील अनेक दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. 

दरम्यान, यंदा पावसानं ऑगस्ट महिन्यात चांगली बॅटिंग केली. त्यामुळं मुंबईकरांवरील पाणी टंचाईचा प्रश्न मिटला. त्याशिवाय, मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ओसंडून वाहू लागल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

आॅगस्ट महिन्यात मुंबईकरांनी मुसळधार पावसाचा अनुभव घेतला. एवढंच नाही, तर आॅगस्टमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने १९५८ पासूनचे  मागचे अनेक विक्रम मोडीत काढले.

आॅगस्ट १९५८ मध्ये सांताक्रूझ वेधशाळेने १२५४ मिमी पावसाची नोंद केली होती. परंतु आॅगस्ट २०२० मध्ये १,२४८ मिमी पावसाची नोंद करताना अवघा ६.३ मिमी पाऊस हा विक्रम मोडण्यासाठी कमी पडला. मात्र या पावसाने आॅगस्ट १९८३ मधील १२४४ मिमी पावसाचा विक्रम मोडीत काढला.

संबंधित विषय