Advertisement

Mumbai Rain Update : मुंबईतल्या पूरपरिस्थितीमुळे लोकल ट्रेन, बसे सेवा प्रभावित

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने मार्ग वळवण्याची घोषणा केली आहे:

Mumbai Rain Update : मुंबईतल्या पूरपरिस्थितीमुळे लोकल ट्रेन, बसे सेवा प्रभावित
SHARES

मुसळधार पावसानंतर मुंबईत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी साचल्याने मुंबई लोकल ट्रेन सेवेवर मंगळवारी परिणाम झाला. शहराची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेन विलंबाने सुरू आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर दररोज 75 लाखांहून अधिक प्रवास करतात.

सकाळी 10.30 वाजता मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले की, मुख्य आणि हार्बर मार्गावरील काही गाड्या उशिराने धावत आहेत. सर्व गाड्या मात्र सेवा अजूनही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळी 11 वाजता पश्चिम रेल्वेने ट्विट केले की, मुंबई उपनगरीय (चर्चगेट ते डहारू रोड) आणि हार्बर लाइन (माहीम ते गोरेगाव) वरील सर्व गाड्या सामान्यपणे धावत आहेत.

शहरातील काही भागांतून रस्त्यांवरील वाहतुकीच्या समस्याही समोर आल्या आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये सायन सर्कल येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतूक संत गतीने सुरू आहे. 

दरम्यान, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने मार्ग वळवण्याची घोषणा केली आहे: "मुंबईतील संततधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे... मुंबईतील सायन रोड क्रमांक 24 आणि शेल कॉलनी, चेंबूर येथे आठ मार्ग बदलण्यात आले आहेत."

खालील बेस्ट बसचे मार्ग बदलण्यात आले आहेत. बस क्र ५,७,८,११,६६,३८५,३५७,५२१ गांधी मार्केट, महेश्वरी उद्यान येथून यांचे मार्ग सुलोचना शेट्टी मार्ग, भाऊ दाजी रोड मार्गे वळविण्यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे पंचशील नगरमध्येही भूस्खलन झाले, असे एएनआयने म्हटले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी असून अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाने सांगितले.

नवी मुंबईतील खांदेश्वर रेल्वे स्थानकावर लोक पाण्यातूनच मार्ग साधताना दिसत आहेत. 

मुंबईत गेल्या 12 तासात 95.81 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सकाळी बैठक बोलावली होती. आपत्ती प्रतिसाद पथके सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सहा जिल्ह्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना गरज भासल्यास पूरग्रस्त भागातून लोकांना बाहेर काढण्यासाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हे सतर्क आहेत.

मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात मंगळवारी सकाळी मुसळधार पाऊस पडला, हवामान खात्याने पुढील २४ तासांत मुंबई आणि त्याच्या उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा