Advertisement

मुंबई, उपनगरांत पावसाची अचानक एण्ट्री


मुंबई, उपनगरांत पावसाची अचानक एण्ट्री
SHARES

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई, उपनगरांत सायंकाळी ४ वाजताच अंधारून आले आणि सोसाट्याचा वारा, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली.

सायंकाळी चार - सव्वा चार वाजेच्या सुमारास अंधार दाटून आला. रात्रीचे ८ वाजल्यासारखे वातावरण झाल्याने मुंबईकरांनी थेट आॅफिसच्या खिडक्यांकडे धाव घेतली.



मंत्रालय -


फोर्ट -


दादर -


सीएसटी -


दक्षिण मुंबईसह, नवी मुंबई, कल्याण, ठाणे परिसारात जोरदार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी हलक्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला. येत्या दोन दिवसांत मुसळाधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा