Advertisement

मुंबई शहरात पावसाची ६१ टक्के हजेरी


मुंबई शहरात पावसाची ६१ टक्के हजेरी
SHARES

मुंबईत जून व जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसानं तुफान बॅटिंग केली. पावसानं ऑगस्ट महिन्यात लावलेल्या हजेरीमूळ मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलावही ओसंडून वाहू लागले. त्याशिवाय, १ जूनपासून १० सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत पावसाची १२ टक्क्यांहुन अधिक नोंद झाली. 

मुंबई शहर, अहमदनगर आणि औरंगाबादमध्ये ६० टक्क्यांहुन अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर मुंबईच्या उपनगरात ५९ टक्के पावसाची नोंद झाली. गुरुवारी मुंबईत ५.६ मिमी पावसाची नोंद झाली असून, आतापर्यत मुंबईत २ हजार ४८० मिमी पावसाची नोंद झाली. त्याशिवाय मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ९८.०१ टक्के भरलेत.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, पुणे, बीड, जालना,  सोलापूर, जळगाव, धुळे या जिल्ह्यांत कमी २० टक्क्यांहुन अधिक पावसाची नोंद झाली. तसंच, ठाणे, सातारा, रायगड, पालघर, नाशिक, नंदुरबार, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि गडचिरोली, या जिल्ह्यांत पावसानं सर्वसाधारण पावसाची नोंद झाली. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा