Advertisement

मुंबईत दिवाळी सणादरम्यान 40 जण भाजले

पालिका रुग्णालयांमध्ये दिवाळीत अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

मुंबईत दिवाळी सणादरम्यान 40 जण भाजले
SHARES

दिवाळी (Diwali) साजरी करताना मुंबईत (mumbai) जवळपास 40 जण फटाक्यांमुळे भाजल्याची घटना घडली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (brihanmumbai municipal corporation) रुग्णालयांमध्ये ही प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या दुखापतीत प्रामुख्याने हातावर आणि चेहऱ्यावर जखम्या झाल्या आहेत.

पालिकेच्या (bmc) आकडेवारीनुसार, कूपर हॉस्पिटलमध्ये दोन, नायर हॉस्पिटलमध्ये सहा, सायन हॉस्पिटलमध्ये 13 आणि केईएम हॉस्पिटलमध्ये (hospitals) 16 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

जखमीं झालेल्यांमध्ये बहुतेक तरुण आणि लहान मुले आहेत. हा अपघात (burn cases) मुख्यतः अयोग्यरित्या फटाके हाताळण्यामुळे झाले आहेत. बहुतेक रूग्णांवर आपत्कालीन विभागात उपचार करण्यात आले. त्यांची काळजी घेण्यात आली आणि त्यांना पुढील उपचारांच्या सूचना देऊन घरी पाठवण्यात आले.

केईएम आणि सायन रुग्णालयात दोन रुग्णांवर तर नायर रुग्णालयात एका रुग्णावर विशेष उपचार करावे लागले. या जखमी रुग्णांमध्ये सर्वात लहान रुग्ण फक्त 3 वर्षांचा चिमुकला होता. तसेच दाखल केलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच त्यांची आवश्यक ती काळजीही घेण्यात आली.



हेही वाचा

वाशी गार्डनमधील उघड्या पाण्याच्या टाकीत 6 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

पश्चिम रेल्वेतर्फे प्रवाशांकडून 50 हून अधिक प्लास्टिक ड्रम जप्त

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा