नुकतेच वाशी (vashi) बागेत (vashi garden) एका 6 वर्षीय मुलाचा पाण्याच्या टाकीत (water tank) बुडून मृत्यू झाला. यासाठी उद्यान निरीक्षक, कंत्राटदार, सुरक्षा रक्षक आणि नवी मुंबई (navi mumbai) महापालिकेच्या (NMMC) उद्यान विभागातील (garden department) अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी सेक्टर 14 येथील गोरक्षनाथ पालवे गार्डन येथे शनिवारी रात्री 6 वर्षीय सिद्धार्थ विशाल उघाडे हा खेळता खेळता उघड्या पाण्याच्या टाकीत पडल्याची दुर्दैवी घटना घडली.
सिद्धार्थचे वडील विशाल उघाडे हे वाशी सेक्टर 15 मध्ये आपल्या कुटुंबासह राहतात आणि ते अनेकदा गोरक्षनाथ पालवे गार्डनमध्ये फिरायला जातात. शनिवारी रात्री 8 च्या सुमारास ते सिद्धार्थला फिरायला घेऊन गेले. विशाल फिरत असताना, सिद्धार्थ इतर मुलांसोबत लपाछपी खेळत होता. खेळता खेळता तो बागेतील उघड्या पाण्याच्या टाकीत पडला.
काही वेळाने सिद्धार्थ सापडला नाही तेव्हा विशालने संपूर्ण बाग शोधली, पण त्याचा काहीच पत्ता लागला नाही. त्यावेळेस संशय आला असता विशाल यांनी बागेच्या कोपऱ्यातील पाण्याची उघडी टाकी तपासली असता आत सिद्धार्थ तरंगताना दिसला. विशाल यांनी सिद्धार्थला वाचवण्यासाठी टाकीत उडी मारली आणि त्याला तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र तेथे पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आले.
माहिती मिळताच वाशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पाहणी केली, त्यानंतर घटनेची अपघाती मृत्यू अशी नोंद केली गेली.
ज्या उघड्या पाण्याच्या टाकीमध्ये सिद्धार्थचा दुःखद अंत झाला, ती व्यवस्थितरित्या बंद करण्यात आली नव्हती. त्या भागात अंधार असल्यामुळे सिद्धार्थला खेळताना उघडी टाकी नाही आली आणि तो पाण्याच्या टाकीत पडला. पाण्याच्या टाकीच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा