Advertisement

शिवाजी पार्कमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

तथापि, रहिवाशांनी निवासी क्षेत्रात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या एमपीसीबीच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला आहे.

शिवाजी पार्कमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध
SHARES

शिवाजी पार्कमधील धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी एमपीसीबीने सोमवारी बीएमसीला निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार शिवाजी पार्कात गवत लावण्यास सांगितले आहे. 

एमपीसीबीने त्यांच्या निर्देशांच्या यादीत जमिनीवर किंवा त्याच्या जवळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्यासही सांगितले आहे. जेणेकरून गवताला पाणी देण्यासाठी  स्वच्छ पाण्याऐवजी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करता येईल. तथापि, रहिवाशांनी निवासी क्षेत्रात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या एमपीसीबीच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला आहे.

दादरच्या शिवाजी पार्कमधील रहिवाशांनी सोमवारी एमपीसीबी अध्यक्षांची भेट घेऊन जमिनीवर उडणारी लाल माती रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती घेतली. 

“शिवाजी पार्कमधील धुळीच्या प्रदूषणाच्या धोक्याला तोंड देण्यासाठी एमपीसीबीच्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो, परंतु सांडपाणी प्रकल्पाला आमचा विरोध आहे. जवळच एक मंदिर आहे. शिवाय, सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याने पाणी घातलेल्या गवतावर चालणे लोकांना सोयीचे होणार नाही,” असे शिवाजी पार्कमधील रहिवासी नंदन मुणगेकर म्हणाले.

मुणगेकर पुढे म्हणाले की, 2021 मध्येच बीएमसीला जमिनीवर लाल माती टाकू नका असे सांगण्यात आले होते. कारण त्यामुळे सध्याच्या रेन हार्वेस्टिंग प्रकल्पाचे नुकसान होईल, परंतु शेवटी त्यांनी ती माती टाकली ज्यामुळे रेन हार्वेस्टिंगसाठीचे खड्डे झाकले गेले. लाल माती टाकल्याने परिसरात धुळीचा धोका निर्माण झाला आहे.

तथापि, बीएमसीच्या पर्यावरण विभागाने सांगितले की, उद्यानात 50 लिटर क्षमतेचा मिनी सांडपणी प्रकल्प बसवणे शक्य आहे. हे यंत्र लहान आहे, मर्यादित सांडपाण्यावर प्रक्रिया करते आणि त्यातून दुर्गंधी येत नाही.

दुसरीकडे, काहींना वाटते की जमिनीवरच गवत वाढवण्याची कल्पना व्यवहार्य नाही. "45 हून अधिक क्रीडा उपक्रम (राजकीय, सार्वजनिक कार्यक्रम) इथे होतात. अशा  परिस्थिती बीएमसी उद्यानात वाढवू इच्छित असलेले गवत टिकवणे अशक्य आहे," असे शिवाजी पार्कचे रहिवासी एएलएम वैभव रेगे म्हणाले.

7.8 एकरच्या मोठ्या शिवाजी पार्कमध्ये, 30 टक्के हिरवळ (क्रिकेट खेळपट्ट्यांसह) आणि 70 टक्के मैदान आहे. 2023 मध्ये, बीएमसीने मैदानावर अधिक हिरवळ विकसित करण्याचा प्रयत्न केला, परंतु जास्त गर्दीमुळे ते टिकू शकले नाही.



हेही वाचा

मंत्रालयातील ‘फेस डिटेक्शन’मुळे पहिल्याच दिवशी गोंधळ

कल्याण-शिळफाटा मार्ग 'या' तारखेपर्यंत बंद

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा