मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी आता फेस डिटेक्शन बसवण्यात आले आहेत. पण हे नवीन तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरले आहे. फेशियल रेकग्निशन सिस्टीमच्या प्रवेशाचा पहिला दिवस गोंधळाचा ठरला आहे. त्यामुळे मंत्रालयात प्रवेश करणारे बराच वेळ तात्कळत उभे राहिले आणि यामुळे गर्दी देखील झाली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की नवीन सिस्टीममुळे केवळ अधिकृत लोकांनाच परिसरात प्रवेश मिळेल याची खात्री होईल, ज्यामुळे अनधिकृत प्रवेश कमी होईल आणि एकूणच सुरक्षा वाढेल. मंत्रालयात येणारे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि निवडून आलेले प्रतिनिधी या सिस्टीममध्ये नोंदणी करतील याची खात्री करण्यासाठी सरकारने मोहीम सुरू केली होती, परंतु पहिल्या दिवशी गोंधळ निर्माण झाला.
तथापि, पहिल्या दिवशी, अनेक सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या चेहऱ्यांची प्रणालीद्वारे ओळख होण्यास अडचणी येत होत्या. ज्यामुळे त्यांना रांगेत उभे राहावे लागले. "माझा चेहरा ओळखला गेला नाही म्हणून मला संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करावी लागली," असे उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने एका वृत्तपत्राला सांगितले.
अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, मान्यता आणि गृह विभागाचे पास असलेल्या पत्रकारांना देखील सुरुवातीला प्रणालीने प्रवेश नाकारला होता. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांना प्रवेश देण्यात आला.
"अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांच्या प्रवेशासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तथापि, त्या सर्वांनी सिस्टमवर त्यांचे चेहरे नोंदवणे आवश्यक असेल. आम्ही त्यांना लवकरात लवकर असे करण्याचे आवाहन करतो." असे सरकारी निवेदनात म्हटले आहे.
कार्यान्वयन कंपनीमार्फत सर्व प्रवेशद्वार येथे फेशियल रिकॉग्नीनेशन यंत्रणा प्रस्थापित करण्यात आली आहे. ही यंत्रणा ' गो लाईव्ह' करण्यात आली आहे. जानेवारी 2025 पासुन मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांना फेशियल रिकॉग्नीनेशन व आरएफआयडी कार्ड आधारित प्रवेश देण्यात येत आहे.
हेही वाचा