Advertisement

लॉकडाऊन ५.० : आजपासून रेस्टॉरंट्स आणि बार सुरू

कन्टेंमेंट झोन वगळून ५० टक्के क्षमतेनं हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे.

लॉकडाऊन ५.० : आजपासून रेस्टॉरंट्स आणि बार सुरू
SHARES

लॉकडाऊन ५.० च्या टप्प्यात आजपासून हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स आणि बार सुरू होत आहेत. कन्टेंमेंट झोन वगळून ५० टक्के क्षमतेनं हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार, २२ हजारांहून अधिक रेस्टॉरंट्स आणि बारपैकी ३० टक्के सोमवारपासून सुरू होतील, असा अंदाज आहे.

राज्यात जरी आजपासून हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स सुरू होत असले तरी व्यवसायकांसमोर उत्पन्नाचं मोठं आवाहन असणार आहे. कारण लॉकडाऊनमध्ये बहुतांश कामगार गावी निघून गेले. त्यामुळे मोजकेच मनुष्यबळ सध्या उपलब्ध आहे.

याशिवाय हॉटेल्स, फूड कोर्ट यांची डागडुजी करणं, स्वच्छचा राखणं देखील आवश्यक आहे. त्यामुळे खर्च आणि उत्पन्न यातील ताळमेळ बसवणं हॉटेल व्यवसायिकांना कठिण जाऊ शकतं. त्यात कोरोनाच्या काळात ग्राहक वर्ग हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये येईल की नाही याची काही शास्वती नाही. त्यामुळे देखील हॉटेल्स व्सवसायक चिंतेत आहेत. 

हॉटेल्स व्यवस्थापनाला शासनानं दिलेल्या गाईडलाईन्सचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. त्यासाठी हॉटेल्स कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी घेणे, हॉटेल्समधील टेबल्स आणि परिसर कसा सॅनिटाईज करणे यासर्व बाबींचा प्रशिक्षणात समावेश आहे.

मार्गदर्शक सूचनांनुसार, हॉटेल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांची माहिती टॅबवर किंवा रजिस्टरवर नोंदवावी लागेल. या नोंदी पुढील 30 दिवस ठेवल्या जातील. रेस्टॉरंट्स, बार आणि कॅफेमध्ये कोणत्याही बुफे सेवा आणि थेट करमणुकीस परवानगी नसेल. 

त्याशिवाय रेस्टॉरंमध्ये प्रवेश देण्यापूर्वी ग्राहकांचं तापमान मोजलं जावं. त्यांना खोकला आणि सर्दी आहे की नाही? याची तपासणी केली जावी. रेस्टॉरंटमध्ये फेस मास्कचा अनिवार्य आहे. खाण्याशिवाय आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचं काटेकोर पालन करणं बंधनकारक आहे.  

जवळपास गेले ५ ते ६ महिने हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार बंद होते. राज्य शासनानं रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. त्यानुसारच हॉटेल्स व्यवसायिकांना सर्व नियमांची अमलबजावणी करावी लागेल.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणारे व इतर कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घेणं महत्त्वाचं राहणार आहे. त्यांनी मास्क लावणं, हात धुणं गरजेचं आहे. रेस्टॉरंटची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

यापूर्वी राज्य सरकारनं ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत निवासी सुविधांना (हॉटेल, लॉज, रिसॉर्टस् इत्यादी) १०० टक्के क्षमतेनं सुरू करण्यास संमती दिली होती. आता नियमांचं पालन करत ५० टक्के क्षमतेनं रेस्टॉरंट्स आणि बार सुरू करण्यास परवानगी आहे.



हेही वाचा

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' उपक्रमाला जी/उत्तर विभागात चांगला प्रतिसाद

'डिलिव्हरी' देणार १५ हजार हंगामी नोकऱ्या

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा