Advertisement

मुंबईतील 'त्या' ७ वॉर्डमध्ये पाणीपुरवठा सुरळीत

या जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळं बंद असलेल्या ७ वॉर्डमधील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

मुंबईतील 'त्या' ७ वॉर्डमध्ये पाणीपुरवठा सुरळीत
SHARES

शीव-ट्रॉम्बे येथील सुमननगर जंक्शनजवळच्या १८०० व्यासाच्या मुख्य जलवाहिनीच्या मोठ्या दुरुस्तीचं काम बुधवारी मध्यरात्री पूर्ण करण्यात आलं आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळं बंद असलेल्या ७ वॉर्डमधील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

शीव-ट्रॉम्बे येथील सुमननगर जंक्शन जवळून जाणाऱ्या १८०० व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यानं अनेक वॉर्डमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होत होता. त्यामुळं ही गळती तातडीनं बंद करण्यासाठी बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आले. या दुरुस्तीमुळं पाणीपुरवठा बंद राहिल्यानं नागरिकांची गैरसोय झाली.

पाणीपुरवठा बंद केल्यानं ए वॉर्ड, ई वॉर्ड, बी वॉर्ड, एफ/उत्तर, एफ/दक्षिण, एम/पूर्व, एम/पश्चिम या वॉर्डमधील पाणीपुरवठा बंद होता. ही दुरुस्ती मोठी असल्यानं मध्यरात्रीपर्यंत काम सुरू होतं अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा